Narcotics : श्रीरामपुरातून १३ कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत

Narcotics : श्रीरामपुरातून १३ कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत

0
Narcotics : श्रीरामपुरातून १३ कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत
Narcotics : श्रीरामपुरातून १३ कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत

Narcotics : नगर : श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील दिघी खंडाळा परिसरातून तब्बल १३ कोटी ७५ लाख ४१ हजारांचे अंमली पदार्थ (Narcotics) श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल (Crime registered) करण्यात आला आहे.  मिनीनाथ विष्णू राशीनकर (वय ३ ८, रा. धनगरवाडी, ता. राहाता, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर विश्वनाथ कारभारी शिपनकर (रा. दौंड, जि पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

याबाबत माहिती अशी की, 

श्रीरामपूर शहर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात एका चारचाकी टेम्पोतून अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दिघी खंडाळा परिसरात सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार एका आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या २१ गोण्या आढळून आल्या. त्यापैकी १४ गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर व ७ गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटीक दिसून आले. याबाबत चालकाकडे चौकशी केली असता स्फटीक हे अल्प्राझोलम औषधाचे असून अल्याझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने खात्री करण्यासाठी अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ञांचे पाचारण करण्यात आले. त्यांनी हे स्फटिक व पावडर हे अल्प्राझोलम असून १३ कोटी ७५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल असल्याचे तपासत समोर आले.

नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई (Narcotics)

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमें, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, उपनिरीक्षक दीपक मेढे, किशोर औताडे, सोमनाथ मुंडले, संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अकबर पठाण, आजिनाथ आंधळे, राहुल पौळ, रमेश रोकडे, राजेश सुर्यवंशी, बाळासाहेब गिरी, नितीन चव्हाण,  रवींद्र बोडखे, अमोल नागरे, नितीन शिरसाठ, दिलीप कुराडे अश्वीनी पवार यांच्या पथकाने केली.