Narendra Dabholkar Murder: ११ वर्षांनंतर दाभोळकर प्रकरणाचा निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, तर तिघे निर्दोष

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आज निकाल देण्यात आला. पुण्यातील विशेष न्यायालयाकडून ११ वर्षांनी आपला निकाल जाहीर केला आहे

0
Narendra Dabholkar Murder
Narendra Dabholkar Murder

नगर : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आज निकाल देण्यात आला. पुण्यातील विशेष न्यायालयाकडून ११ वर्षांनी आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. त्यापैकी सचिन अंदुरे (Sachin Andure), शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश यांनी या आरोपींना जन्मठेप सुनावली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

नक्की वाचा : आयपीएलमधील पंजाब किंग्सचे आव्हान संपुष्टात,आरसीबीचा ६० धावांनी विजय

दाभोलकर हत्या प्रकरणात तीन आरोपींची निर्दोष मुक्तता (Narendra Dabholkar Murder)

या गुन्ह्यातील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आला आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

अवश्य वाचा : स्वतःचे सरण रचून त्याने पत्करले मरण!

यातील आरोपी वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष सोडले आहे. आरोपी संजीव पुनाळेकर यांनी मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. तर विक्रम भावे यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. तर आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदूरे यांना भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरविले गेले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एका वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणखी वाढणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

दाभोलकरांची हत्या नेमकी कशी झाली ? (Narendra Dabholkar Murder)

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here