Narendra Firodia : नगर : शहरात फिरोदिया शिवाजीयन्सने (Firodia Shivajiyans Football Academy) फुटबॉल खेळ रुजवून यामधील उत्कृष्ट खेळाडूंसह (Player) प्रशिक्षक व पंच देखील घडविण्याचे काम केले आहे. फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. शहरात फुटबॉल (Football) हा मुख्य खेळ बनला असून, स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह दिसून येत आहे. या स्पर्धेत ४७ संघांचा रेकॉर्ड ब्रेक सहभाग लाभला आहे. हारणे-जिंकणे हा स्पर्धेचा भाग असून, स्पर्धेतून स्वत:ला सिध्द करता येत, असे प्रतिपादन उद्योजक तथा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.
अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन
फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहिल्यानगर शहरात अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धाचे सोमवारी (ता.२५) उद्घाटन उद्योजक फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, फिरोदिया शिवाजीयन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव राजू पाटोळे, प्रदीप जाधव, उपाध्यक्ष खालिद सय्यद, राणासिंह परमार, जोगासिंह मिनहास, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, विक्टर जोसेफ, अहमदनगर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सॅवियो वेगास, कोअर कमिटी सदस्य जेव्हिअर स्वामी, राजेश ॲंथनी, सचिन पठारे, पल्लवी सैंदाणे, श्रेया सागडे, अभिषेक सोनवणे आदींसह प्रशिक्षक, पंच व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक
ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले, (Narendra Firodia)
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला आहे. यामध्ये ४७ शालेय मुला-मुलींच्या संघाने सहभाग घेतला आहे. १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १०० पेक्षा अधिक सामने रंगणार आहेत. या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पाठबळाने शहरात फुटबॉल खेळाला चालना मिळाली आहे. सलग सात वर्षे ही स्पर्धा घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आले आहे. स्पर्धेचा अनुभव खेळाडूंसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज वाळवेकर म्हणाले की, फिरोदिया शिवाजीयन्सच्या माध्यमातून फुटबॉल खेळाडू घडविण्याचे काम केले जात आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शहरात फुटबॉल वाढविण्याचे काम सुरु असून, शहरातील खेळाडूंनी विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशातून गुणात्मक प्रगतीचा आलेख सर्वांपुढे असल्याचे ते म्हणाले.
या स्पर्धेत ९ मुलींचे संघ आहेत. ही स्पर्धा १२, १४ व १६ वयोगटातील मुलांमध्ये होणार आहे. तर १७ वर्षा खालील मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येत आहे. सूत्रसंचालन रिया तिवारी यांनी केले. या स्पर्धेसाठी दरवर्षी मैदान उपलब्ध करुन देत असल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे आभार मानण्यात आले.
उद्घाटन सत्रानंतर पहिल्याच दिवशी झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलच्या मुला-मुलींच्या संघाने विजय मिळवला. प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल या १७ वर्षा आतील मुलींच्या संघात प्रवरा पब्लिक स्कूलने दमदार खेळी करुन ४-० गोलने विजय मिळवला. मुलांच्या १४ वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूलने ६-० गोलने पोदार इंटरनॅशनल स्कूलचा पराभव केला. १२ वयोगटातील प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने ६-० गोलने ऊर्जा गुरुकुल संघावर मात केली. तर संध्याकाळी झालेल्या १६ वर्ष वगोगटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द ऊर्जा गुरुकुल मध्ये अटातटीचा सामना रंगला होता. यामध्ये देखील प्रवरा पब्लिक स्कूलने २-० ने विजय संपादन केले.