Narendra Firodia : इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्यसेवा : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

Narendra Firodia : इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्यसेवा : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

0
Narendra Firodia : इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्यसेवा : उद्योजक नरेंद्र फिरोदिया
Narendra Firodia : इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्यसेवा : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

Narendra Firodia : नगर : सर्व अद्यावत सुविधांनी युक्त असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये (Indo Irish Hospital) नगर जिल्ह्यातील रुग्णांच्या खिशाला परवडतील अशा माफक दरात सर्व आरोग्यसेवा (Healthcare) उपलब्ध होणार आहेत. त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगर येथील प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.

मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन (Narendra Firodia)

इंडो आयरिश हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत सर्व रोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कायगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगावकर, इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप जोंधळे, अमरीश सूर्यवंशी, राकेश जोंधळे, रोहित जोंधळे, बाजीराव खांदवे, यशवंत पाटील, पल्लवी जोंधळे, डॉ. प्राची जोंधळे, ज्ञानेश्वर जोंधळे सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे आदी उपस्थित होते.

इंडो आयरिश हॉस्पिटलमध्ये १० जून ते २० जून या कालावधीमध्ये मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पाठ दुखी, गुडघेदुखी, स्त्री रोग, बालरोग, किडनी विकार, डायलेसिस व जनरल सर्जरी अशा प्रकारच्या तपासण्या व माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

सर्व तपासणीवर ५० टक्के पर्यंत सवलत (Narendra Firodia)

कॅशलेस सुविधा, मोफत रक्तातील साखर तपासणी, २४ तास अत्यावश्यक सेवा व ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध, ५० टक्के सवलतीमध्ये उपचार तसेच सोनोग्राफी, एक्स-रे, पॅथॉलॉजी, सिटीस्कॅन, टू डी इको, ईसीजी, एनजीओग्राफी, वंध्यत्व निवारण व इतर सर्व तपासणीवर ५० टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे. तरी या शिबिराचा व रुग्णालयामधील विविध आरोग्यसेवांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन, इंडो आयरिश हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवारी सुरू झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास रुग्णांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे यांनी सूत्रसंचालन केले. इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप जोंधळे यांनी हॉस्पिटल विषयी माहिती दिली. पल्लवी जोंधळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास इंडो आयरिश हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास इंडो आयरिश हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here