Narendra Firodia : नगर : आज समाजात अनेक घटक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, अशा घटकांच्या गरजा पूर्ण करुऩ त्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अनेक वंचित मुले-मुली शिक्षणापासून (Education) दूर आहे. अशा मुला-मुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्था (Niranjan Sevabhavi Sanstha) करत असलेले कार्य फार मोठे आहे. मुलांना शिक्षित करुन त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे. निरंजन सेवाभावी संस्थचे हे काम संपुर्ण राज्याला दिशादर्शक असे काम ठरेल, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे गरजू व गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योजक संजय पुगालिया, उद्योजक अनुराग धुत, निरंजन संस्थेचे अतुल डागा, स्वप्नील कुलकर्णी, विशाल झंवर, सुमित चांडक, राहुल झंवर, निलेश बिहाणी, किरण मनियार, अमित खटोड, मुकूंद धुत, सुहास चांडक आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: मराठ्यांचं वादळ साेमवारी नगरमध्ये धडकणार; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी, असे असेल नियोजन
अनिरुद्ध धुत म्हणाले,
मागील १२ वर्षांपासून जिल्ह्यात निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे. या संस्थेचे काम वाडी-वस्त्यांवरील उपेक्षित घटकातील गोर-गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे व शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे हे आहे. या त्यांच्या कार्यास आमचे सदैव सहकार्य राहील.
अवश्य वाचा : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा;ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
संजय पुगलिया म्हणाले, (Narendra Firodia)
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. समाजात अनेक दु:ख, दुर्लक्षित घटक आहे. त्यांचे दु:ख काही प्रमाणात आपण नक्कीच वाटून घेऊ शकतो. आपल्या छोट्याशा मदतीने मुलांचे भविष्य उज्वल होणार असले तर त्यात आपला सहभाग असलाच पाहिजे. निरंजन संस्था ही मुलांचे भविष्य घडवत असल्याचे त्यांनी सांगितले.
अतुल डागा म्हणाले की, या आमच्या उपक्रमामध्ये सर्वांचे सहकार्य मिळत आहे. यापुढेही ते मिळत राहिल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचेही मोठे सहकार्य मिळत आहे. आज ६५० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यात आले. मुलांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अडचण येऊ न देण्यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविकात जयेश कासट यांनी निरंजन संस्थेतर्फे राबविण्यात येणार्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आर.जे.प्रसन्ना यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्निल कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक लहू बोराटे यांनी आकर्षक अशी रांगोळी रेखाटली होती.