Narendra Firodia : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत

Narendra Firodia : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत

0
Narendra Firodia : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत
Narendra Firodia : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत

Narendra Firodia : नगर : आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे (Bhairavnath Devasthan Agadgaon) सुरू असलेल्या अन्नछत्रालयासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी गेले वर्षभर सुमारे दहा लाखांचे तेल दिले. तसेच पुढील वर्षीही लागणारे तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या अन्नछत्रालयासाठी मोठी मदत झाली आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

नक्की वाचा : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ

प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी -आमटी असा महाप्रसाद

भैरवनाथ देवस्थानमध्ये प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी -आमटी असा महाप्रसाद सुरू असतो. सोबत गोड पदार्थ, ठेचा, भात असे पदार्थ असतात. प्रत्येक भाविकाला मोफत पोटभर जेवण, असे त्याचे स्वरुप असते. यासाठी अन्नदात्यांकडून देणगी स्वीकारली जाते. या भूमित अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भाविकांकडून पुढील सुमारे सहा महिन्यांची नावनोंदणी झाली आहे. वाढदिवसासारखे निमित्त असेल, तर त्याला लवकर अन्नदानाची सेवा देण्यासाठी ट्रस्टकडून नियोजन केले जाते. प्रत्येक रविवारी सुमारे दहा हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.

Narendra Firodia : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत
Narendra Firodia : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत

अवश्य वाचा : शेवगाव, पाथर्डीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेकडून नऊ गुन्ह्याची उकल

तेलासाठी नरेंद्र फिरोदिया यांनी वर्षभर दिली देणगी (Narendra Firodia)

अन्नदानाच्या उपक्रमासाठी मोठा खर्च येतो. अन्नदात्यांकडून अत्यंत माफक मदत घेतली जाते. उर्वरीत मोठ्या खर्चामध्ये तांदूळ, तेल याचा समावेश असतो. तेलासाठी नरेंद्र फिरोदिया यांनी गेल्या वर्षभर देणगी दिली. पुढील वर्षासाठी लागणारे तेलही आपण देणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले. दरम्यान, फिरोदिया यांनी यापूर्वी बस, रुग्णवाहिका तसेच विविध विकासकामांसाठी मोठी मदत दिली आहे. करोना काळात त्यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परिसरातील ग्रामस्थांना मोफत सेवा देण्यात आली, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.