Narendra Firodia : मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

Narendra Firodia : मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

0
Narendra Firodia : मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे : उद्योजक नरेंद्र फिरोदिया
Narendra Firodia : मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

लोककलेचा वारसा टिकवण्यासाठी ‘फोकवंत’ या उपक्रमाचे उद्घाटन

Narendra Firodia : नगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याला ३५१ वर्षे पूर्ण झाल्याने, इतिहासाच्या सुवर्ण अध्यायातील तो अभिमानाचा क्षण आपण रंगभूमीच्या रणभूमीवर साजरा करत आहोत. शिवरायांनी लोककलेला कायमच राजाश्रय दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा वाढीस लागली. मात्र, आजच्या डिजिटल युगात मराठमोळ्या परंपरांचा वारसा जपणाऱ्या त्या लोककला नष्ट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ‘फोकवंत’ (Folkvant) या अभिनव लोककला चळवळीची आजपासून सुरुवात करत आहोत, असे प्रतिपादन अहिल्यानगर महाकरंडक (Ahilyanagar Mahakarandak) स्पर्धेचे अध्यक्ष तथा ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.

नक्की वाचा : कर्जतमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणारी ‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ या एकांकिका स्पर्धा आजपासून सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात सुरू झाली आहे. या स्पर्धेत आय लव्ह नगर फाउंडेशनतर्फे फोकवंत हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन प्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया बोलत होते. यावेळी चित्रपद अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, दिग्दर्शक आशिष वाघ, दिग्दर्शक मयूर हरदास, अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, सोहम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, आय लव्ह नगरच्या व्यवस्थापिका विशाखा पितळे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटे स्पर्धा : सचिन जाधव

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (Narendra Firodia)

‘फोकवंंत’ हे लोककलांचा प्रचार अन् प्रसार करण्याचं हे खुलं व्यासपीठ असणार आहे. ज्याद्वारे राज्यभरातील कलाकारांना आपल्या कला बिनदिक्कत सादर करता येतील. महाराष्ट्रातील लोककला या महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘फोकवंत’ हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. यातून नव्या कलाकारांना व्यासपीठ देणे, नव्या पिढीला या लोकपरंपरा, लोकवाद्ये, लोककलेची ओळख करून देणे आदी कामे होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.