Narendra Firodia | नगर : खेळामुळे संघभावना, नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. संघटन हीच सामाजिक शक्ती आहे. त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. खेळातून सामाजिक संघटन कसे साधावे याचे ज्ञान मिळते. स्व. राहुल पितळे हे जॉईसच्या (JOYS) स्थापनेपासून सक्रिय सदस्य होते. त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा झाली. अहमदनगर ओसवाल पंचायत सभा व जैन ओसवाल युवक संघाने स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले, असे प्रतिपादन जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.
हे वाचा – इमारती, घरांच्या बांधकामावेळी अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात : शंकर मिसाळ
सोहम चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली (Narendra Firodia)
स्व. राहुलजी पितळे यांच्या स्मरणार्थ अहमदनगर ओसवाल पंचायत सभा व जैन ओसवाल युवक संघ (JOYS)तर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही नगर क्लबच्या मैदानावर १३ ते २० एप्रिल या कालावधीत सोहम ग्रुपतर्फे प्रायोजित सोहम चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. ही स्पर्धा पुरुष, महिला व लहान मुले अशा तीन गटांत खेळविण्यात आली. या स्पर्धेतील पुरुष गटातील अंतिम सामन्यात मुनोत सुपरकिंग्स संघाने ३४ धावांनी सामना जिंकत सोहम चषक पटकावला. महिला गटात मिस मॅच क्विन्स तर लहान मुलांच्या गटात कॉन्प्लेक्स हिरोज संघ अजिंक्य ठरला.
नक्की वाचा : पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश
पारितोषिक वितरण (Narendra Firodia)
पारितोषिक वितरण उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उद्योजक विक्रम फिरोदिया, जैन ओसवाल पंचायत सभेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए अशोक पितळे, राखी भाभी पितळे, गौरव पितळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जैन ओसवाल पंचायत सभेचे सहसचिव संतोष गांधी, पतसंस्थेचे संचालक चेतन भंडारी, जॉईजचे अध्यक्ष प्रतीक बाबेल, सचिव सचिन मुनोत, चेतन बोगावत, प्रमोद (नेवासकर) मुनोत, संजय मुनोत, सीए अजय मुथा, युवा नेते सुरेंद्र गांधी, निधीश पितळे, सोहम फिरोदिया, अनुष्का फिरोदिया, करुणा मुनोत, प्रणिल मुनोत, परेश गांधी, किरण पितळे, आदित्य गांधी, जय भंडारी, पवन गुंदेचा, ऋषभ कटारिया आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहमदनगर ओसवाल पंचायत सभा व जैन ओसवाल युवक संघाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य मिळाले.
अवश्य वाचा : शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनकडून धर्मवीरगडातील हत्तीमोट बारवेची स्वच्छता
सीए अशोक पितळे म्हणाले (Narendra Firodia)
सीए अशोक पितळे म्हणाले की, जैन ओसवाल युवक संघाने राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेझी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी खेळाचा आनंद घ्यावा म्हणून एकत्र येत, आपुलकीचा संवाद घडण्यास मदत होईल. एकमेकांचा परिचय होईल, नवीन मैत्री स्नेहबंध जुळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुनोत सुपरकिंग्स संघ विजयी (Narendra Firodia)
या स्पर्धेतील अंतिम सामना मुनोत सुपरकिंग्स व किंग्स ऑफ हेवन या दोन संघांत रविवारी (ता. २०) रात्री झाला. ११ षटकांच्या सामन्यात मुनोत सुपरकिंग्स संघाने प्रथम फलंदाजी करत पाच गडी गमावत ११८ धावा जमवल्या. निखिल सावजने सर्वाधिक २० धावा केल्या. तर स्वरुप गांधीने १८, रोहित पिपाडाने १६, देव भंडारीने १६ धावा जमवल्या. किंग्स ऑफ हेवनकडून संभव कासवा, वेदांत पटवा, कर्णधार श्रेणिक मुनोत व वंश फिरोदियाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या किंग्स ऑफ हेवनचे फलंदाज मुनोत सुपरकिंग्सच्या भेदकमाऱ्या समोर टिकाव धरू शकले नाहीत. किंग्स ऑफ हेवनचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद होत राहिले. किंग्स ऑफ हेवेनकडून आशिष भंडारी (१० धावा), नक्षत्र शिंगी (नाबाद १६ धावा) व यश मुथा (११ धावा) यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश खेचून आणता आले नाही. अखेर किंग्स ऑफ हेवनचा संपूर्ण संघ ९.४ षटकांत सर्व गडी गमावत ८४ धावाच जमवू शकला. मुनोत सुपरकिंग्सकडून देव भंडारी व रोहित पिपाडाने प्रत्येकी दोन तर तेजस गुंदेचा, निखिल गुगळे, ऋतिक मुनोत व कर्णधार संकेत गांधीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. पुरुषांच्या अंतिम सामन्यात रोहित पिपाडा (मुनोत सुपरकिंग्स) सामन्याचा मानकरी, तिर्थेश कटारिया सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कुशल मुनोत सर्वोत्कृष्ट फलंदाज तर देवेश गुगळे सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. ओजस बोरा मालिकावीर ठरला.
महिलांच्या गटात मिस मॅच क्विन्स विरुद्ध सैफरॉन हिल्स गुगळे हाय फ्लायर्स या संघांत अंतिम सामना झाला. मिस मॅच क्विन्स अजिंक्य ठरले. नुतन गुंदेचा सामनावीर, रोशनी भंडारी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सोनल गुगळे सर्वोत्कृष्ट फलंदाज, सिद्धी बोरा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, दर्शना काठेड मालिकावीर ठरल्या.
लहान मुलांच्या गटात कुशल वॉरियर्स विरुद्ध कॉन्प्लेक्स हिरोज या संघांत अंतिम सामना झाला. कॉन्प्लेक्स हिरोज विजयी झाले. प्रीत गुगळे सामनावीर, अरूष शिंगवी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ईशान गांधी सर्वोत्कृष्ट फलंदाज, क्रिशय बोरा सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर प्रीत गुगळे मालिकावीर ठरला.