Narendra Firodia : शहरातील नागरिकांना लाठी काठीचे प्रशिक्षण कायम स्वरूपी मिळावे यासाठी चांगले प्रशिक्षक तयार करा : नरेंद्र फिरोदिया

Narendra Firodia : शहरातील नागरिकांना लाठी काठीचे प्रशिक्षण कायम स्वरूपी मिळावे यासाठी चांगले प्रशिक्षक तयार करा : नरेंद्र फिरोदिया

0

Narendra Firodia : नगर : एकमेकांना कधीच त्रास होणार नाही अशी समाज निर्मिती होण्याची गरज आहे. पण सध्या परिस्थिती खूप बिघडत चालली आहे. प्रत्येकाने स्वसंरक्षण व कुटुंबाच्या संरक्षणासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी लाठी काठीचे प्रशिक्षण उत्तम पर्याय आहे. अहिल्यानगर मधील जास्तीत जास्त नागरिक, युवक, युवती व बालकांनी अशा शिबिरात सहभागी होणे गरजेचे आहे. पुढील काळात शहरात लाठी काठीचे प्रशिक्षण (Lathi kathi Training) कायम स्वरूपी मिळावे यासाठी चांगले प्रशिक्षक तयार करा. प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना (School Student) याचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी प्रशिक्षक तयार होण्यासाठी पुढकार घ्यावा, असे आवाहन उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

परिस्थिती बदलणे गरजेचे (Narendra Firodia)

अहिल्यानगर मधील सकल राजस्थानी व गुजराती समाजाच्या वतीने शहरातील सर्वांसाठी आयोजित लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केशर गुलाब मंगल कार्यालयात उद्योजक व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे भारत भारतीच्या राष्ट्रीय सचिव साधना राव, प्रदेश सचिव डॉ.धर्मेंद्र राजवद, उद्योजक जितेंद्र बिहाणी, चंद्रकांत मुनोत  फाउंडेशनच्या मेघना मुनोत आदींसह आयोजक संस्थांचे पदाधिकारी व सहभागी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जितेंद्र बिहाणी म्हणले, समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे अति नम्रता नसावी. पण जैन, राजस्थानी, गुजराथी समाजाच्या अति नम्र स्वभावामुळे हा समाज प्रतिकार करत नाहीये असा समज झाला आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून लाठी काठी प्रशिक्षणातून हे प्रत्यक्षात येईल. कमलेश भंडारी यांनी यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांना कायम सहकार्य करू.

Narendra Firodia : शहरातील नागरिकांना लाठी काठीचे प्रशिक्षण कायम स्वरूपी मिळावे यासाठी चांगले प्रशिक्षक तयार करा : नरेंद्र फिरोदिया
Narendra Firodia : शहरातील नागरिकांना लाठी काठीचे प्रशिक्षण कायम स्वरूपी मिळावे यासाठी चांगले प्रशिक्षक तयार करा : नरेंद्र फिरोदिया

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

मेघना मुनोत म्हणाल्या,

मुली महिलांप्रती समाजाने आदर बाळगावा. तरुणांमधील विकृती नष्ट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून लाठी काठी प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले.

प्रास्तविकात कमलेश भंडारी म्हणाले, पहेलगाम सारख्या आपत्कालीन घटनांमध्ये कुटुंबासह स्व संरक्षण करता येणे खूप गरजेचे आहे. यासाठी नव्या पिढीला सक्षम करण्यासाठी या लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच संघटना एकत्र आल्या असून अनेकांनी बहुमोल सहकार्य केले. या सुटीत लाठी काठीचे प्रशिक्षण शिबिराचे घेतले आहे. दिवाळीच्या सुटीत तलावार व दानपट्टा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० हून अधिक नागरिक, महिला व लहान मुलांनी सहभाग घेतला आहे. सर्वांना पुणे येथील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याचे विजय आचवले व तज्ज्ञ प्रशिक्षक शास्त्रोक्त प्रशिक्षण देत आहेत. धनेश कोठारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाम भुतडा यांनी आभार मानले.

यावेळी राकेश भंडारी, प्रतिक बाबेल, मधु भंडारी, आनंद मुथा, संदेश मुनोत, अमित काबरा, रुपेश पारख, हर्षल बोरा, पवन गुंदेचा, भारत भारतीचे रमेश रासने, हरिष हरवानी, चंद्रकांत पंडित, समीर बोरा, मनीष सोमाणी, सचिन भंडारी, सचिन डुंगरवाल, सत्येन गुंदेचा, प्रवीण शिंगवी व प्रमोद गांधी आदींसह अहिल्यानगर शहरातील जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन ओसवाल युवक संघ, माहेश्वरी युवक मंडळ, सकल राजस्थानी युवा मंच, जय आनंद महावीर युवक मंडळ, जय आनंद फाउंडेशन, दालमंडई, श्री महावीर प्रतिष्ठान ट्रस्ट, जितो अहिल्यानगर, जिंगर युवा मंच, वर्धमान युवक संघ, समस्त गुजराथी समाज, भारत भारती, जिजाऊ ग्रुप व वंदे मातरम युवा प्रतिष्ठान आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.