Narendra Firodia | नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धेचा पुण्याचा प्रशांत सोमवंशी विजेता तर मध्यप्रदेशचा देवेंद्र परमार उपविजेता

0
Narendra Firodia
Narendra Firodia

Narendra Firodia | नगर : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित दुसऱ्या नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) चषक बुद्धिबळ स्पर्धे च्या बक्षीस वितरण समारंभास जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा १८ ते २० जुलै या दरम्यान लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांना जिल्हा बुद्धिबळ (Chess) संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.  या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पाच लाख रुपये रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात आली. या स्पर्धेत पुण्याचा प्रशांत सोमवंशी विजेता ठरला तर मध्यप्रदेशचा देवेंद्र परमार उपविजेता ठरला.

हेही वाचा – मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा राडा;नेमकं घडलं काय?

पारितोषिक वितरणाला उपस्थिती (Narendra Firodia)

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, स्वप्निल बहगुरकर, सुनील जोशी, संजय खडके, स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, शार्दुल टापसे, अमरीश जोशी, सनी गुगळे, शिशीर इंदुरकर, देवेंद्र ढोकळे, प्रशांत धंगेकर, गोरक्षनाथ पुंड, चेतन कड, मनीष जसवानी, विष्णू कुद्रे, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, डॉ. स्मिता वाघ आदीसह खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा – ‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित;सती प्रथेवर आधारित चित्रपट

१८ राज्यातून खेळाडूंचा सहभाग (Narendra Firodia)

जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेला १८ राज्यातून व महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यातून बुद्धिबळ खेळाडू सहभागी होते. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. अनेक रोमहर्षक व उत्कंठा पूर्ण डाव नगर करांना पाहता आले. या स्पर्धेत २०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सहभागी झाले होते. ही या स्पर्धेच्या दृष्टीने  महत्त्वाचे होते. आपल्या भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की जिल्ह्यातील अनेक दर्जेदार बुद्धिबळ खेळाडू घडवण्यासाठी वेळोवेळी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून बुद्धिबळ हा खेळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळ वाढवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न केला जात आहे. जे खेळाडू इतर स्पर्धेत टाळ्या वाजवतात त्यांना या स्पर्धेत रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले. बक्षीस वितरण समारंभास खेळाडू व पालक याने लक्ष्मीनारायण कार्यालय तुडुंब भरले होते.

या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.

मुख्य पारितोषिक

प्रथम- प्रशांत सोमवंशी, द्वितीय- देवेंद्र परमार, तृतीय- शिबांतक शहा, चतुर्थ- वैभव संकनाबाशेत्तर, पाचवे- सार्थक शिंदे, सहावे- सोहम नगरेचा, सातवे- सोहम रूमदे, आठवे- राजवर्धन तनवर, नववे- धनंजय खाडे, दहावे- श्रीधर तावडे, अकरावे- नीरज देसाई, बारावे- दीपक कुतियपण, तेरावे- दीपणकर कांबळे, चौदावे- विठ्ठल खिल्लारे, पंधरावे- आदित्य तिवारी.

बेस्ट रेटिग 1500 /
प्रथम- गणेश कुमार, द्वितीय- अजय राजवत, तृतीय- सोहम लांगोरे, चतुर्थ- प्रथम शस्त्रबुद्धे,  पाचवे- योगराज महाले, सहावे- आंबेरे ओजस, सातवे- रामा किलुमू, आठवे- महादेव पंचम, नववे- चारीत सुभाजित, दहावे- अथर्व घोडके.  

बेस्ट अनरेटेड
प्रथम- प्रसाद फडके, द्वितीय- प्रणव हलभवी, तृतीय- नरकर शहा, चतुर्थ- विजय जाधव,  पाचवे- धोंडी भावेश, सहावे- सुजल लांबोरे, सातवे- संकेत खोट, आठवे- राजकुमार बंडगर, नववे- ओमकार पवार, दहावे- रिदम शहा.

उत्कृष्ट महिला
प्रथम- दुर्वा बोंबले, द्वितीय- तन्मई घेते, तृतीय- अश्वी अग्रवाल, चतुर्थ- कृतिका पुस्तके, पाचवे- पलक सोनी, सहावे- भक्ती गवळी, सातवे- स्वरा गांधी, आठवे- रेणुका गोविंदवर, नववे- प्रणिता भावा, दहावे- हर्षी गुप्ता.

बेस्ट 60 वयस्कर खेळाडू
प्रथम- दीपक ढेपले, द्वितीय- ओपी तिवारी, तृतीय- साहू कुमार, चतुर्थ- करणकर पद्माकर,  पाचवे- संजय भंगे .

बेस्ट 50 वयस्कर खेळाडू
प्रथम-अभिजीत फडके , द्वितीय- एस कल्कावकर, तृतीय- संजय तोडकर, चतुर्थ- सुनील जोशी,  पाचवे-धनंजय काकडे.

बेस्ट अहिल्यानगर खेळाडू
प्रथम- यश धाडगे, द्वितीय- अनय महामुनी, तृतीय- वेदांती इंगळे, चतुर्थ- हिमांशू मकीजा,  पाचवे- वर्धन अच्छा.

बेस्ट अहिल्यानगर तालुका खेळाडू
प्रथम- आदेश देखने, द्वितीय- तन्मय नीली, तृतीय- राजवीर शिंदे, चतुर्थ- तेजस वायल,  पाचवे- नक्ष गांधी.

उत्कृष्ट 15 वर्षांखालील
प्रथम- सायली झेंडे, द्वितीय- व्यंकटेश करवा, तृतीय- कृष्णा कुलकर्णी, चतुर्थ- श्रीहर्ष नईर,  पाचवे- अर्णव टोटला.

उत्कृष्ट 13 वर्षांखालील
प्रथम- ऋग्वेद पोद्दार, द्वितीय- ब्रिजेश, तृतीय- यश टंडन, चतुर्थ- आराध्या वाघ,  पाचवे- सिद्धांत नारायण.

उत्कृष्ट 11 वर्षांखालील.  
प्रथम- रुद्रा अग्रवाल, द्वितीय- प्रेयस वाघमारे, तृतीय- जेय मेहता, चतुर्थ- श्रीयश कुदळे,  पाचवे- सर्वध्या बालगुडे.

उत्कृष्ट 9 वर्षांखालील
प्रथम- रियांश बोराटे, द्वितीय- देवांश पाटील, तृतीय- आदिनाथ म्हणते, चतुर्थ- रिधान अग्रवाल,  पाचवे- अध्रित डूबे.

उत्कृष्ट 7 वर्षांखालील.  
प्रथम- कविष भातड, द्वितीय- प्रीतिका नंदी, तृतीय- ईशान अग्नीहोती, चतुर्थ- आराध्या देसाई,  पाचवे- कबीर दळवी. आधी खेळाडूंना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले व बाकीच्या खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here