नगर : दैनंदिन जीवनात विद्यार्थी दशेत बुद्धिबळ हा खेळ विद्यार्थ्यांनी जोपासल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सर्वतोपरी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आशा एज्युकेशन फाउंडेशन तथा अहमदनगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिराेदिया (Narendra Firodiya) यांनी केले.
नक्की वाचा : यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!
बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन (Narendra Firodiya)
नगर शहरातील जय बजरंग विद्यालयामध्ये शालेय अंतर्गत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिराचे उद्घाटन अहमदनगर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिराेदिया यांच्या हस्ते आज (ता. २१) राेजी करण्यात आले. यावेळी आशा एज्युकेशन फाउंडेशनचे सहसचिव उमेश गांधी, विद्यालयाच्या प्राचार्या संगीता पाठक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, तपोवन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षा कुसकर, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, सदस्य पारुनाथ ढोकळे, संदीप देसरडा, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर आदी उपस्थित हाेते.