Narendra Modi : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल

Narendra Modi : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल

0
Narendra Modi
Narendra Modi

Narendra Modi : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज नगरमध्ये महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil), सदाशिव लाेखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. एससी, एसटी, ओबीसी, गरीब यांच्याकडे संपूर्ण आरक्षण आहे. आता हे इंडिया आघाडीवाले म्हणत आहे, की यांचं संपूर्ण आरक्षण हिसकावून मुस्लिमांना देणार आहे, असा आराेप माेदी यांनी विराेधकांवर केला.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

माेदी म्हणाले (Narendra Modi)

 ” इंडिया आघाडीतील लालू यादव यांनी म्हटले की, इंडिया आघाडी सत्तेत आले, तर देशात मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण देणार आहे. आपल्या वोट बँकसाठी ते हे काम करणार आहे.  इंडिया आघाडी संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. आपल्या वोट बँकेला खूश करण्यासाठी हा प्रयत्न आहे. हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. मुंबईत २६-११ चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानमधून झाला होता. आपल्या जवानांना कोणी शहीद केले. सगळ्या जगाला हे माहीत आहे. पण काँग्रेस पक्ष दहशतवादी बेकसूर असल्याचे सर्टिफिकेट देत आहे. मुंबई हल्ल्याबाबत काँग्रेसच्या नेत्याने कसाबची बाजू घेतली आहे. काँग्रेसचे हे नेते कसाबला निर्दोष म्हणत आहेत. हा शहिदांचा अपमान आहे. काँंग्रेसचा स्तर खाली जात आहे. अशा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एकही सीट मिळायला हवी का? ‘ असा सवाल माेदींनी जनतेला विचारला आहे. उत्तरेत सुरु झालेल्या निळवंडे डॅमचे काम १९७० मध्ये सुरु झाले होते. आज त्याची किंमत करोडो रुपयांनी वाढली आहे. हे पाप काँग्रेसचे आहे. काँग्रेसने नेत्यांचा खिशा भरला. पण शेतकऱ्यांची जमीन कोरडी राहिली. देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला गती दिली. यामुळे नाशिक आणि नगरमधील शेकडो गावांना पाणी मिळणार आहे.’

Narendra Modi
Narendra Modi : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल

नक्की वाचा: कांदा निर्यातीला सरकारचा खोडा

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Narendra Modi)

यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील, सदाशिव लाेखंडे, आमदार संग्राम जगताप, आमदार राम शिंदे, आमदार माेनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, अनुराधा नागवडे, माजी महापाैर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित हाेते.

माेदी पंतप्रधान हाेताच नगरचे नाव अहिल्यानगर हाेणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  ”माेदी हे पंतप्रधान हाेताच नगरचे नाव अहिल्यानगरच हाेणार आहे. कुकडी, साकळाईचा प्रश्नही लवकरच मार्गी लावणार आहे. नगरमध्ये नवीन एमआयडीसीत येणाऱ्या काळात माेठे उद्याेग येणार आहे. त्या माध्यमातून अनेकांना राेजगार मिळणार आहे. येत्या १८ महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.

पश्चिम वाहिनीचे पाणी वळवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ”माेदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. पश्चिम वाहिनीचे पाणी वळून नगर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करणार आहे. कुकडी, साकळाई कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्या कामाचे तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here