Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती? ना घर, ना कार, ना जमीन वाचा सविस्तर

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती? ना घर, ना कार, ना जमीन वाचा सविस्तर

0
Narendra Modi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती? ना घर, ना कार, ना जमीन वाचा सविस्तर

Narendra Modi : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वाराणसीतून नुकताच तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोदींनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकातून त्यांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार

2 कोटी 85 लाख 60 हजारांची एफडी (Narendra Modi)

मोदींनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये दोन खाते असून त्यापैकी एक खाते गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे तर दुसरे खाते वाराणसीच्या शिवाजी नगर शाखेत आहे. पंतप्रधान मोदींच्या गुजरात बँक खात्यात 73 हजार 304 रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त सात हजार रुपये आहेत. पीएम मोदींची एसबीआयमध्येच 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची एफडी आहे. तसेच त्यांच्याकडे 52 हजार रुपये रोख आहेत. पंतप्रधानांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.

नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त

एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये

याशिवाय जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे 45 ग्रॅमच्या सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ना घर आहे ना जमीन आहे ना कार. या स्थितीत त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे.

Narendra Modi
Narendra Modi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here