Narendra Modi : नगर : विद्यमान काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) बुधवारी पंतप्रधान (Prime Minister) पदाचा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्याकडे सोपवला. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून नरेंद्र मोदी यांची नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कायम राहण्याचे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा: साताऱ्यात शरद पवार गटाला ‘पिपाणी’चा फटका
तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या मदतीने केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार आहेत. ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी ८ जून रोजी होण्याची शक्यता होती. परंतु, आता रविवारी ९ जून रोजी शपथविधी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
नक्की वाचा: विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर!
यांची असणार उपस्थिती (Narendra Modi)
नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. या तारांकित शपथविधी सोहळ्यात अनेक परदेशी नेते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राअध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचा समावेश आहे.