Narendra Modi : नगर : विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्याचा मनस्वी आनंद देशवासियांना आहे. आत्मनिर्भर भारत (India) आता विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली तिसऱ्या टर्मची वाटचाल ही संपूर्ण विश्वामध्ये गौरवशाली ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय
फटाक्यांच्या आतषबाजीने शपथविधीचा आनंद द्विगुणीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. बुहेतक गावांमध्ये भर पावसातही भाजप पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणीत केला. सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदी विराजमान होत असलेल्या मोदीजींनी दहा वर्षांच्या कारकिर्दीत देशाची प्रतिमा सर्वच पातळ्यावर उंचावली. लोककल्याणाच्या अनेक योजना तळागाळात पोहोचविल्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएचे सरकार स्थापन होऊन हॅट् ट्रिक साधली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती’-देवेंद्र फडणवीस
महासत्तेच्या दिशेने वाटचाल (Narendra Modi)
अयोध्येतील श्रीराम मंदिर, ३७० कलम, वंदे भारत एक्सप्रेस, डिजीटल पेमेंटची सुविधा या बरोबरीनेच देशातील महिला, शेतकरी, युवावर्ग या सर्वांनाच केंद्रीभूत मानून पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या योजना या सातत्याने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. येणाऱ्या काळात देशाची आर्थिक महासत्ता ५ ट्रीलियन डॉलर्स करण्याचे त्यांचे स्वप्न या तिसऱ्या टर्ममध्ये निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच भारत देश आता महासत्तेच्या दिशेने करीत असलेली वाटचाल लक्षात घेता पंतप्रधान मोदींच्या कर्तृत्वाची रेषा मोठी होत असल्याचा अभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशवासियांना असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.