Narendra Modi : विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
Narendra Modi : विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Narendra Modi : विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : नगर : लोकसभेनंतर महाराष्ट्र विधासभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) वेध आता सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी सात्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. ठाण्यातील मेट्रोसह विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. “महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विकासकामे रोखण्याचा प्रयत्न केला, पण आता विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवण्याचं काम करा”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय,१११ पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या

महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान

यावेळी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा फक्त महाराष्ट्राचा आणि मराठीचा सन्मान नाही तर मराठी साहित्य कला आणि संस्कृतीचा देखील सन्मान आहे. मी देशातील सर्व मराठी बोलणाऱ्यांना शुभेच्छा देतो. ठाण्यात येण्याच्या आधी मी वाशिममध्ये होतो. त्या ठिकाणी नऊ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी जारी करण्याचा योग मला प्राप्त झाला. आजच्या दिवसाची अनेक लोक वाट पाहत होते”, असंही मोदी म्हणाले.

अवश्य वाचा: प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, (Narendra Modi)

“विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीला संधी मिळाली की ते विकासाचे काम थांबवण्याचे काम करतात. मुंबई मेट्रो हे देखील त्याचच एक उदाहरण आहे. मात्र, विकासकामांच्या आड येणाऱ्यांना आता सत्तेपासून लांब ठेवा. महाविकास आघाडी जोपर्यंत सत्तेत होती, तोपर्यंत अनेक प्रकल्पाचं काम थांबवलं. अडीच वर्ष काम थांबवल्यामुळे मेट्रोचा खर्च १४ हजार कोटींनी वाढला. मग हे पैसे कोणाचे होते? सर्व सामान्य नागरिकांनी भरलेला टॅक्सचे होते”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला.