Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र माेदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा : सुजय विखे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र माेदी हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा : सुजय विखे

0
Narendra Modi
xr:d:DAF5Y3epXKI:919,j:3837490898561238355,t:24040611

Narendra Modi : नगर : मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील. त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्त्व देऊ नका. तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेवून ही देशाची निवडूक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा, असा संदेश भाजपचे (BJP) उमेदवार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

xr:d:DAF5Y3epXKI:916,j:4561444535299524378,t:24040611

हे देखील वाचा: मद्यपींनाे लक्ष द्या; जिल्ह्यात चार दिवस ‘ड्राय डे’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

भाजप वर्धापन दिनानिमित्त मेळावा

राहुरीतील भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलताना म्हणाले, ”केवळ विकास हेच माझे ध्येय आहे. केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे.”

नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश

गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी (Narendra Modi)

डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्याचबरोबर मतदार संघातील बूथ कमिटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमिट्या सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनीती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.

Narendra Modi 3
xr:d:DAF5Y3epXKI:918,j:1954986254270944100,t:24040611

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here