Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या काळात आधुनिक शेतीचा मार्ग सुकर : सुजय विखे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या काळात आधुनिक शेतीचा मार्ग सुकर : सुजय विखे

0
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil


Narendra Modi : नगर : मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. पारंपरिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने (Central Govt) कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुकर केला आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

डाॅ. विखे पाटील म्हणाले (Narendra Modi)

 चिंचोडी पाटील येथील महायुतीच्या सभेत बोलताना डाॅ. विखे पाटील म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह शेती क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांना आणि त्यांचे प्रयत्न सुरक्षित करणे, त्यांना तंत्रज्ञानाचे जाणकार बनवणे, कृषी संशोधन आणि शिक्षणाला चालना देणे आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले जात आहे.” यावेळी जिल्हा बॅंकेचे  अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजप तालुकाध्यक्ष अशोक कार्ले, राष्टवादीचे तालुकाध्यक्ष अशोक कोकाटे, मार्केट समितीचे माजी संचालक हरिभाऊ कर्डिले, शिवसेना तालुकाध्यक्ष अजित दळवी, युवा सेना अध्यक्ष सचिन ठोंबरे आदी उपस्थित हाेते.

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

डाॅ. विखे म्हणाले (Narendra Modi)

”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेला न्यू इंडिया हा त्यांच्या सबका साथ, सबका विकास या ब्रीद वाक्यावर चालतो आणि शेतकरी कल्याण हा त्याचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही परिवर्तनाचा प्रारंभिक जोर हा जागरूकतेतून येतो आणि ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  या संदर्भात, लॅब-टू-लँड, हर खेत को पानी आणि पर ड्रॉप मोअर क्रॉप यांसारख्या संदेशांच्या सरकारच्या प्रेरणादायी योजनांनी शेतीची उत्पादकता वाढली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे काम जलद गतीने होत आहे आपल्यासारख्या राष्ट्राची, जिथे जवळपास निम्मी कामगार शक्ती शेतीमध्ये गुंतलेली आहे, शेती शाश्वत केल्याशिवाय भरभराट होऊ शकत नाही. यामुळे तंत्रज्ञानापासून पीक विम्यापर्यंत, सुलभ कर्ज उपलब्धतेपासून ते आधुनिक सिंचन पद्धतींपर्यंत, संपूर्ण शेती चक्रामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक कृती योजना राबवून पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सुरू केले आहे.”

Sujay Vikhe
Sujay Vikhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here