Narendra Modi : नगर : कोराेना (Corona) संकटाच्या काळात देशातील आरोग्य व्यवस्थेला विकास प्रक्रियेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झाले. प्रत्येक सामान्य माणसाला घराजवळच आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आज कृतीत उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींची मंगळवारी नगरमध्ये ताेफ धडाडणार; कुणावर निशाणा साधणार
आरोग्य विषयक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरु (Narendra Modi)
इंडियन मेडिकल असोशिएशन, निमा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सर्व डॉक्टर्स, फार्मासिस्ट, पॅथोलॉजिस्ट यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, भाजपाचे अध्यक्ष अभय अगरकर, विनायक देशमुख, इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलींद पोळ, सेक्रेटरी सचिन पंडुळे, रवींद्र साताळकर, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. प्रकाश कांकरीया, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता काडळकर, लॅब असोसिएशनचे अध्यक्ष निनाद आकोलकर आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा: काँग्रेसमध्ये राहून सर्व निष्ठा शरद पवारांप्रती वाहिल्या; विनायक देशमुखांचा बाळासाहेब थाेरातांवर हल्लाबाेल
आरोग्य सेवेला विकासाच्या प्रक्रियेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम (Narendra Modi)
केंद्र आणि राज्य सरकारने आरोग्य विषयक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. आयुष्यमान भारत योजनेचा मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारनेही महात्मा फुले जनआरोग्य योजना आता नव्या बदलाच्या स्वरुपात सुरु केली आहे. यामध्ये येणाऱ्या त्रृटी दूर केल्या जातील. कोराेना नंतर आरोग्य सुविधा अधिक परिपूर्ण कशा होतील, यासाठीच मोठी गुंतवणूक आता करण्यात येत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आरोग्य सेवेला विकासाच्या प्रक्रियेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम मागील दहा वर्षात झाले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेमध्ये सुद्धा आरोग्य सुविधेला प्राधान्यक्रम आहेच, या बरोबरीनेच जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीही औद्योगिक आणि पर्यटन विकासातून होऊ शकते. यासाठी आता जिल्ह्याचा विकास आराखडाही तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला साहित्य, कला, संस्कृतीचा मोठा वारसा आहे, त्या दृष्टीन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर एखादी शाखा सुरु करतानाच शहरातील वाडियापार्कला आंतरराष्ट्रीय चेहरा मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न होईल, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.