Narendra Modi: पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय;पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे.

0
Narendra Modi: पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय;पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी
Narendra Modi: पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय;पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी

नगर : नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच पंतप्रधान म्हणून मोदींनी पहिली सही (Modi First Sign) शेतकऱ्यांसाठी केली आहे. या निर्णयानंतर आता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.

नक्की वाचा :  भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय 

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये (Narendra Modi)

पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. असे असतानाच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या नरेंद्र मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत शेतकऱ्यांना  दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे. मोदी यांच्या या निर्णयानंतर पुढच्या काही दिवसांतच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत.

अवश्य वाचा : मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर;’आम्ही जरांगे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

पीएम शेतकरी सन्मान निधीच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी (Narendra Modi)

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या १७ व्या हफ्त्याची वाट पाहत होते. पण आता नव्या सरकारची स्थापना होताच १७ वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे. आता पुढच्या काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार आहेत. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मदत होणार आहे.  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. ६०००/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो. या हफ्त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here