Narendra Modi:’देशातील दोन भ्रष्ट कुटुंबातील युवराज मला २४ तास शिव्या देत असतात’- नरेंद्र मोदी

0
Narendra Modi:'देशातील दोन भ्रष्ट कुटुंबातील युवराज मला २४ तास शिव्या देत असतात'- नरेंद्र मोदी
Narendra Modi:'देशातील दोन भ्रष्ट कुटुंबातील युवराज मला २४ तास शिव्या देत असतात'- नरेंद्र मोदी

Narendra Modi : “देशातील दोन मोठ्या प्रस्थापित व भ्रष्ट कुटुंबांमधील युवराज सतत मला शिव्या देत असतात. गरिब घरातून व मागासवर्गीय समाजातून पुढे आलेला व्यक्ती त्यांना बघवत नाही”,असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बिहारमध्ये (Bihar) केले आहे. नरेंद्र मोदी हे सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Vidhansabha Election) प्रचारात व्यस्त आहेत. भारतीय जनता पक्षाने आज बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये प्रचारसभेचं आयोजन केलं होतं. या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते. यावेळी त्यांनी मुझफ्फरपूरमधून देशातील दोन नेत्यांवर सडकून टीका केली.

नक्की वाचा: बच्चू कडू यांचा एल्गार नेमका कशासाठी ? प्रमुख मागण्या कोणत्या ?   

जामिनावर घरी आलेल्या व्यक्तीला सन्मान दिला जात नाही- मोदी (Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात दोन युवकांची जोडी तयार झाली आहे. हे दोघे स्वतःला राजपुत्र मानतात. या दोन्ही युवराजांनी खोटी आश्वासने देण्याची दुकानं उघडली आहेत. यापैकी एक देशातील सर्वात मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे, तर दुसरा बिहारमधील सर्वात मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे. या दोघांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. मात्र, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आपल्या गावाकडे अशा लोकांना किंमत नसते. जामिनावर घरी आलेल्या व्यक्तीला सन्मान दिला जात नाही.”

अवश्य वाचा: लोककला आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

दोन्ही युवराज मला २४ तास शिव्या देतात – मोदी (Narendra Modi)

“या दोन्ही युवराजांनी मला खूप शिव्या दिल्या आहेत. ही नामदार माणसं आहेत. आता हे नामदार लोक माझ्यासारख्या कामदाराला शिव्या देणारच. कामदाराला शिव्या दिल्याशिवाय यांचं खाल्लेलं अन्न पचत नाही. दलितांना, मागासवर्गीयांना शिव्या देणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, असं हे युवराज समजतात. त्यामुळे ते लोक मला २४ तास शिव्या देत असतात. माझा व माझ्यासारख्या लोकांचा तिरस्कार करतात. मला शिव्या दिल्याशिवाय यांना स्वस्थ बसता येत नाही.”