Narendra Modi:’सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा’ -नरेंद्र मोदी

0
Narendra Modi:'सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा' -नरेंद्र मोदी
Narendra Modi:'सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा' -नरेंद्र मोदी

Narendra Modi : “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,वक्फ कायदा २०१३ पर्यंत लागू होता. यावेळी काँग्रेसने निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून कायद्यात सुधारणा केली. हा कायदा अशा प्रकारे बनवण्यात आला की,बाबासाहेबांचे संविधान (Babasaheb’s Constitution) उद्ध्वस्त झाले. जर त्याचा योग्य वापर केला असता तर मुस्लिमांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करण्याची गरज पडली नसती.”अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली.

नक्की वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार,महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!  

‘सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा’ (Narendra Modi)

नरेंद्र मोदी आज (१४ एप्रिल) हरियाणा दौऱ्यावर आहेत. सकाळी १० वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. येथून हिसार-अयोध्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या नंतर त्यांनी विमानतळावरच जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की,”काँग्रेस म्हणते की,हे मुस्लिमांच्या हितासाठी केले गेले. मी विचारू इच्छितो की, जर काँग्रेस पक्षाला मनापासून मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल तर त्यांनी एका मुस्लिमाला त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष बनवावे, परंतु त्यांचे नेते असे काहीही करणार नाहीत. त्यांना फक्त देशातील नागरिकांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत”,असं मोदींनी सांगितले आहे.

अवश्य वाचा : विदर्भात तीन दिवस पाऊस बरसणार;हवामान विभागाचा अंदाज 

‘चप्पल घातलेला माणूसही विमानात उडेल’ (Narendra Modi)

पंतप्रधान मोदी म्हणाले,”आता हरियाणातील श्रीकृष्णजींची पवित्र भूमी आता अयोध्याशी थेट जोडली गेली आहे. लवकरच हिसारहून इतर शहरांसाठीही विमानसेवा सुरू होईल. माझे वचन आहे की, चप्पल घालणारेही विमानातून प्रवास करतील. गेल्या १० वर्षांत, कोट्यवधी भारतीयांनी आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास केला आहे. ज्या ठिकाणी चांगले रेल्वे स्थानके नव्हती तिथेही आम्ही नवीन विमानतळ बांधले आहेत. आज देशातील विमानतळांची संख्या १५० च्या पुढे गेली आहे’,असं सांगितले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here