नगर : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. एका माध्यमाला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केलं नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आता भाविकांना मूळ रूपात पाहता येणार
‘महात्मा गांधींची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही’ (Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,“महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.
अवश्य वाचा : दीपा कर्माकरने रचला इतिहास;’जिम्नॅस्टिक’मध्ये जिंकले पहिले सुवर्णपदक
‘जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात’ (Narendra Modi)
“मी संपूर्ण जग फिरलो आहे. जगभरात मार्टीन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. परंतु गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे”. असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली.