Narendra Modi:ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय 

0
Narendra Modi:ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय 
Narendra Modi:ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय 

नगर : पाकिस्तानी (Pakistan) दहशतवादाला भारताने आज मोठा दणका दिला.ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त (9 terrorist camps destroyed) केले. भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेत आज या संपूर्ण हल्ल्याची माहिती पुराव्यांसह दिली. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मोठा निर्णय घेतला आहे. 

नक्की वाचा : भारताने पाकिस्तानला घरात घुसून मारलं;‘ऑपरेशन सिंदूर’ नेमकं काय ?   

भारतीय लष्कराने मोहीम फत्ते केली (Narendra Modi)

भारतीय लष्कराने आज (ता.७) मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी हल्ल्याला सुरूवात केली. तर १ वाजून ३० मिनिटांनी भारतीय लष्कराने ही मोहीम फत्ते केली. बरोबर २५ मिनिटांत ही कारवाई भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली. आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली.या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी रहिवासी विभागाला किंवा पाकिस्तानी लष्कराच्या तळाला धक्का पोहोचवण्यात आला नाही.

अवश्य वाचा : देशातल्या कोणत्या जिल्ह्यात होणार मॉकड्रील,त्यात महाराष्ट्र आहे का ?  

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय (Narendra Modi)

भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत अद्यापतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदींनी परदेश दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्सचा दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.