नगर : ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी अयोग्य होईल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. लोकसभा २०२४ च्या (Loksabha 2024) निवडणुकीत पंतप्रधान मोदींकडून जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिम असा जातीय रंग दिला जातोय, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी हे मोठं विधान केलंय.
नक्की वाचा : गाझा युद्धात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण; कर्नल वैभव काळे यांचा हल्ल्यात मृत्यू
नरेंद्र मोदींचा प्रचाराचा धडाका (Narendra Modi)
माझ्या देशातील प्रत्येक जातीचा व्यक्ती मला मतदान करेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. देशात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी प्रचार सभा घेत आहेत. पहिल्या चार टप्प्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी देशाचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढलेत.
हेही वाचा : बर्फीने दिला गावाला रोजगार!
नरेंद्र मोदी काय म्हणालेत ? (Narendra Modi)
मी कधीही हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करणार नाही. ज्या दिवशी मी असं करेल, त्या दिवशी सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र नसेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मी जिथे लहानचा मोठा झालो, तिथे अनेक मुस्लिम राहतात. लहानपणीपासूनच माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत, असंही मोदी म्हणाले. “माझ्या घरात आजूबाजूला सर्व मुस्लिम कुटुंबे आहेत. आमच्या घरातही ईद साजरी होते. ईदच्या दिवशी माझ्या घरी जेवण बनवले जात नव्हते. कारण मुस्लिम बांधवांकडून आम्हाला जेवण मिळायचे. मोहरम सणाच्या दिवशीही मी तजिया खालून जात होतो. त्यावेळी अनेक मित्र माझ्या सोबत असायचे. मात्र २००२ गोध्रा घटनेनंतर माझी प्रतिमा जाणूनबुजून मलीन करण्यात आली, असंही मोदींनी म्हटलं आहे.