नगर : देशभरात आज शिवजयंतीचा (Shivajayanti) उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज ३९५ वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मराठीतून ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
नक्की वाचा : ‘राजीनामा प्रकरणी धनंजय मुंडेंनाच प्रश्न विचारा’;‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांचे स्पष्टीकरण
नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये नेमकं काय ? (Narendra Modi)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : ‘आरडी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच;चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिवजयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी फक्त राजा, महाराजा, राजपुरुष नाही, तर माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठं काहीही नाही,असं नरेंद्र मोदी व्हिडीओमध्ये बोलत आहेत.