Nashik MNC Sexual Harassment: कधी अश्लील भाषा तर कधी थेट स्पर्श; नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग

0
Nashik MNC Sexual Harassment: कधी अश्लील भाषा तर कधी थेट स्पर्श; नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग
Nashik MNC Sexual Harassment: कधी अश्लील भाषा तर कधी थेट स्पर्श; नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग

नगर : नाशिक शहरातील एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कार्यालयात (Nashik MNC Sexual Harassmen) एक लाजिरवाणा प्रकार घडला आहे. या कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation of Young Women) करून त्यांच्यावर विशिष्ट धर्मसंस्कृती लादण्याचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा: ‘बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला मी काँग्रेसला देईन,पण…’; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

नेमकं घडलं काय? (Nashik MNC Sexual Harassment)

मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या एका मल्टिनॅशनल कंपनीच्या कार्यालयात पीडित महिला, युवतींसह संशयित आरोपी वेगवेगळ्या पदांवर २०२२ सालापासून नोकरीला होते. त्याचठिकाणी पीडितांसोबत या आरोपींची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत कार्यालयात काम करताना त्यांच्याशी बळजबरीने संवाद साधण्याचा प्रयत्न हे संशयित आरोपी करत होते. कधी अश्लील संवाद वापरून तर कधी शरीराला जाणूनबुजून शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर वैयक्तिक आयुष्याबाबत पीडितांसोबत बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न करत संशयितांनी विनयभंग केल्याचे फिर्यादीत मध्ये म्हटले आहे.

अवश्य वाचा: सोलापूरच्या पोरांचा नादच खुळा; सात पैकी चार उपजिल्हाधिकारी पदाचा मान सोलापूरच्या सुपुत्रांना

या प्रकरणात पीडितेला शाकाहारी असतानाही बळजबरीने मांसाहार खाद्यपदार्थ खाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच, कार्यालयातून सुटी झाल्यानंतर पीडित महिलेचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजीसुद्धा करण्यात येत होती. या प्रकरणी एकूण नऊ पीडितांनी फिर्याद दिली असून, त्यावरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ गुन्हे विनयभंग, धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.

या विनयभंगप्रकरणी एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी बुधवारी आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाच्या स्तरावर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. मात्र  कंपनीतुन समोर आलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा राज्यात खळबळ उडाली आहे.

१२ अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांची पथकात नियुक्ती (Nashik MNC Sexual Harassment)


या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी १२ अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांच्या अनुभवी निरीक्षकांचा समावेश आहे.