Nashik-Pune Railway : संगमनेर : नाशिक पुणे रेल्वे (Nashik-Pune Railway) ही संगमनेर मार्गे व्हावी, याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह आम्ही पाठपुरावा केला. 2012 मध्ये हा मार्ग मंजूर झाला. मात्र आता रेडिओ दुर्बिणीचे कारण दाखवले जात आहे. त्यावर पर्याय म्हणून नारायणगाव दुर्बिणीच्या (Narayangaon Telescope) लांब क्षेत्रावरून रेल्वे नेता येईल आणि ही रेल्वे संगमनेर वरूनच गेली पाहिजे, हा आपला आग्रह असून आपण संगमनेर अकोल्याच्या जनतेसोबत असल्याचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchoure) यांनी म्हटले आहे.

नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत शिवसेनेचे अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेर वरूनच गेली पाहिजे. कारण यामुळे संगमनेर मधील व्यापार शिक्षण उद्योजकता वाढीस लागणार आहे. याचबरोबर पुणे नाशिक मुंबई या सुवर्ण त्रिकोणावरील रेल्वे मार्गामुळे विकासाची गती वाढणार आहे.
नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी याकरता पाठपुरावा
2009 ते 14 या काळामध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत आम्ही या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2012 मध्ये या मार्गाला मंजुरी दिली. त्यावेळेस नारायणगाव येथील रेडिओचे दुर्बीण केंद्र असे कोणतेही कारण दिले नाही आणि जर असे असते तर त्याच वेळेस हे कारण द्यायला पाहिजे होते. त्यानंतर मागील काळात संगमनेर मधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या अनेक शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळावे आणि 19 फेब्रुवारी 2024 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये नाशिक पुणे रेल्वे शिर्डी मार्गाहून नेण्याची घोषणा केली. यानंतर संगमनेर सह सर्वत्र असंतोष निर्माण झाला ही रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी याकरता आपण तातडीने पाठपुरावा केला याचबरोबर 20 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला या रेल्वे बाबत आपण लोकसभेमध्ये तीन वेळेस प्रश्न उपस्थित केला आहे यापुढेही या रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करणार आहे.
अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप
भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले (Nashik-Pune Railway)
आमदार सत्यजित तांबे यांनी रेल्वे मार्गासाठी उभारलेल्या जन आंदोलनात आपण सहभागी आहोत. याचबरोबर आमदार सत्यजित तांबे संगमनेरचे व अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी राज्य अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला पाहिजे. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या मार्गासाठी विनंती केली पाहिजे. राज्य आणि केंद्र मिळून आपण एकत्रित हा मार्ग संगमनेरवरूनच करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेरमार्गे झाली पाहिजे ही जनतेची भावना आहे आणि त्यासोबत आपण आहोत, असे भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले.



