Nashik-Pune Railway : अकोले : तालुक्यामध्ये रेल्वे (Nashik-Pune Railway) प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. खासदार, आमदारांसह सर्वपक्षीय नेते रेल्वेप्रश्नी एकवटले असल्याचे चित्र दिसत आहे. अकोले तालुक्यातून रेल्वे गेलीच पाहिजे यासाठी शालेय विद्यार्थीही या आंदोलनात उतरले आहेत. थेट पंतप्रधान, रेल्वेमंत्री (Railway Minister), मुख्यमंत्री (Chief Minister), पालकमंत्री, खासदार, आमदार यांना पत्रव्यवहार सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
विद्यार्थ्यांचा शहरातून रॅली काढून रेल्वे संदर्भात एल्गार
अगस्ती विद्यालय, मॉडर्न हायस्कूल व अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.१५) शहरातून रॅली काढून रेल्वे संदर्भात एल्गार पुकारला. यावेळी विद्यार्थ्यांनी अकोलेतून रेल्वे आलीच पाहिजे अशा घोषणा देत अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांना लिहिलेले पत्र पोस्ट ऑफिसजवळील पत्रपेटीमध्ये टाकली. पोस्ट ऑफिसमध्ये पत्राचा तुटवडा आल्याने अजून १५ हजार पत्र मागविण्यात आले असून ते टप्प्याटप्याने मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांना पाठविण्यात येणार आहेत.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
डॉ. किरण लहामटे यांचा रॅलीमध्ये सहभाग (Nashik-Pune Railway)
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे हे राजूरकडे जात असताना त्यांनी आपले वाहन थांबवून विद्यार्थ्यांच्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी डॉ. अजित नवले, विनय सावंत, गिरीजा पिचड, सुरेश गडाख, बाजीराव दराडे, महेश नवले उपस्थित होते.



