Nashik–Pune Semi High-Speed ​​Railway : अकोले रेल्वे कृती समितीचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा  

Nashik–Pune Semi High-Speed ​​Railway : अकोले रेल्वे कृती समितीचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा  

0
Nashik–Pune Semi High-Speed ​​Railway : अकोले रेल्वे कृती समितीचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा  
Nashik–Pune Semi High-Speed ​​Railway : अकोले रेल्वे कृती समितीचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा  

Nashik–Pune Semi High-Speed ​​Railway : संगमनेर: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा (Nashik–Pune Semi High Speed ​​Railway) मार्ग बदलण्यात आल्याने अकोले तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ अकोले रेल्वे कृती समितीच्या (Akole Railway Action Committee) वतीने मंगळवारी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा (March) काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद

ही रेल्वे अकोले–संगमनेर मार्गेच नेण्यात येण्याची मागणी

अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी सकाळी सहा वाजता अकोले येथून संगमनेरच्या दिशेने मोर्चाला सुरुवात केली. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही अकोले–संगमनेर मार्गेच नेण्यात यावी व अकोले येथे थांबा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. मोटारसायकल रॅलीसह हा मोर्चा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरातील नवीन नगर रोडवरील प्रांत कार्यालयावर धडकला.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी

राज्य व केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी (Nashik–Pune Semi High-Speed ​​Railway)

मोर्चादरम्यान राज्य व केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “रेल्वे आमच्या हक्काची आहे”, “घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांनी प्रांत कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनाला संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला. डॉ. अजित नवले यांनी यावेळी आक्रमक भाषण करत केंद्र शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सायंकाळी पाच वाजता प्रांत अधिकारी अरुण उंडे यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी विनय सावंत, मारुती मेंगाळ, गिरीजा पिचड, अमित भांगरे, सुरेश गडाख, बाजीराव दराडे, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, कैलास वाकचौरे, शिवाजी नेहे, ॲड. सागर शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.