Nashik–Pune Semi High Speed ​​Railway : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील

Nashik–Pune Semi High Speed ​​Railway : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील

0
Nashik–Pune Semi High Speed ​​Railway : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील
Nashik–Pune Semi High Speed ​​Railway : चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील

Nashik–Pune Semi High Speed ​​Railway : अकोले: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे (Nashik–Pune Semi High Speed ​​Railway) देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो. मात्र २०१९ साली तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या काळात बदल कोणी केला? हे सुध्दा जनतेला कळू द्या, अशा शब्दांत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

देवठाणमध्ये विविध विकासकामांचे उद्घघाटन

देवठाण (ता. अकोले) जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकासकामांचा देवठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या शाळाखोल्यांचे उद्घघाटन, विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डाचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सभेत मंत्री विखे पाटील यांनी प्रथमच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर भाष्य करून, रेल्वे पळविल्याचा आरोप करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. माजी आमदार वैभव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आमदार अमोल खताळ, डॉ. जालिंदर भोर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सीताराम भांगरे, शिवाजी धुमाळ, सुधाकर देशमुख, रावसाहेब वाकचौरे, मारूती मेंगाळ, कैलास वाकचौरे, सरपंच विजया सहाणे, अंजना बोंबले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात

विखे पाटील म्हणाले, (Nashik–Pune Semi High Speed ​​Railway)

स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी रेल्वेच्या प्रश्नावरून काहींनी शिट्या वाजवायला सुरूवात केली आहे. मात्र यांचा भोंगा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देवून, सध्या कोण कोणत्या रेल्वेच्या डब्यात बसले आणि कोणत्या डब्याला कोणाचे इंजिन जोडले गेले समजायला तयार नसल्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

पाणी आणि रेल्वेच्या संदर्भात होत असलेल्‍या आरोपाचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले, पाणी पळवायला आम्ही तर खूप लांब आहोत, मध्ये कोण आहेत हे आधी तपासा. रेल्वेच्या बाबतीत सुध्दा देवठाणहून जाणारा प्रस्तावित मार्ग २०२१ साली महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणी बदलला हे सुध्दा पाहा. महाविकास आघाडी सरकारमध्‍ये कोण मंत्री होते, २०१९ मध्‍ये तयार केलेला प्रस्‍तावित मार्ग कोणी बदलला या प्रश्‍नाचे उत्‍तर सुध्‍दा मिळाले पाहीजे. मी तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय न करण्याची तसेच बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असून २०१९ साली देवठाणसह नाशिक पुणे रेल्वेच्‍या प्रस्तावाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


या भागातील लोकांनी केलेल्या त्यागामुळे जिल्‍ह्याच्‍या पाण्याचे प्रश्न सुटले गेले. आता या भागातील लोकांसाठी काहीतरी करायचे आहे. आहे त्या पाण्यावर अवलंबून राहाता येणार नाही. अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरू केले असून, बिताका प्रकल्पाद्वारे २०० ते ३०० एमसीएफटी पाणी आढळा खोऱ्यात वळविण्याकरीता सर्व्हेक्षणाच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी आवश्यक असलेला निधी सुध्दा मंजूर करण्याचे आश्वासित केले.

तालुक्यात रोजगार निर्माण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पर्यटन धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून युवकांबरोबर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी टाटा आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या सहकार्याने ट्रेनिंग सेंटर उभारण्याची तयारी असल्याचे पालकमंत्री म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांचे काम होत आहे. देवठाण येथे कार्यान्वित झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत योजनेची देण आहे. प्रत्येक समाज घटकाला विकास प्रक्रीयेत सामावून घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभराव पिचड यांनी रेल्वेच्या विषयांवरून विरोधकावर टीका केली. स्व. मधुकर पिचड यांनी तत्कालीन मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे देवठाणहून रेल्वे नेण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मात्र सध्याच्या आमदारांना आपली रेल्वे गेल्याचे समजले सुध्दा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रस्तावात कोणी बदल केला त्यावेळी कोण मंत्री होते सर्वांना माहीत आहे. कोणतेही विकासकाम सध्याच्या लोकप्रतिनिधींना करता आले नसल्याची टीका त्यांनी केली.


मारूती मेंगाळ यांनी मंत्री विखे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून विकासकाम होत आहेत. अधिकचा निधी द्यावा आशी मागणी करून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सातही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपल्या नेतृत्वाखाली विजय संपादन होईल याची ग्वाही दिली.