National Ayurveda Day : नगर : ‘आयुर्वेद जन जन साठी… पृथ्वीच्या कल्याणासाठी…’ अशा घोषणा देत गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील (Gangadhar Shastri Gune Ayurved College) प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. २०) सकाळी शहरातून जनजागृती रॅली (Awareness Rally) काढली. आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीचे फलक व विविध आयुर्वेदीक औषधांचे झाडे घेतली होती. येत्या २३ सप्टेंबरला साजरा होणाऱ्या १० व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त (National Ayurveda Day) आयुर्वेदाच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली.
गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे यांनी रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.सुरज ठाकूर, माजी प्राचार्य डॉ.संगीता देशमुख आदींसह प्राध्यापक व सर्व विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
यावेळी प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे म्हणाले,
भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, आयुर्वेद विद्यापीठ नाशिक व गंगाधर गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या दशपूर्ती वर्षा निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रम, विविध स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने रॅली काढून नागरिकांमध्ये आयुर्वेदाची जनजागृती केली आहे. २३ सप्टेंबरला महाविद्यालयात भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शरीराच्या विविध भागांचे मॉडेल, अयीर्वेद उपचार पद्धतीचे माहिती देणारे मॉडेल, आयुर्वेद वनस्पती व औषधे आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
उपप्राचार्य डॉ.सुरज ठाकूर म्हणाले, (National Ayurveda Day)
मंगळवार (ता. २३) ला होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असणार आहेत. हे प्रदर्शन सकळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जनजागृती रॅली महाविद्यायात आल्यावर सहभागी विद्यार्थ्यी १० च्या आकड्यात उभे राहून घोषण देत १० व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे महत्व विषद केले. यावेळी डॉ.निळकंठ ठाकरे, डॉ.पौर्णिमा जगताप, डॉ. उत्क्रांती सलगरे, डॉ.रुपाली म्हसे व डॉ.निलेश बकाल व डॉ. अमित शिनगारे आदींसह सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.