National Boxing Championship : राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या खुशी जाधवची सुवर्ण पदकाला गवसणी

National Boxing Championship : राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या खुशी जाधवची सुवर्ण पदकाला गवसणी

0

National Boxing Championship : नगर : चेन्नई येथे भारतीय बॉक्सिंग महासंघाने (Boxing Federation of India), पहिली बी एफ आय कप, बॉक्सिंग टूर्नामेंट (National Boxing Championship) 2025 चे आयोजन दिनाक 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत केले होते. या स्पर्धेत अहिल्या नगर जिल्हा बॉक्सिंग संघटनेची खेळाडू खुशी दीपक जाधव, हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व 54 किलो वजन गटात केले. तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत दिल्ली, हरियाणा, गुजरात व भारतीय पोलिस संघाच्या खेळाडूंचा एकतर्फी पराभव करीत अंतिम स्पर्धेत प्रवेश केला व अंतिम सामन्यात भारतीय पोलिस संघाच्या (INDIAN POLICE SERVICE) खेळाडूचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

नक्की वाचा : ६ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल

सुवर्ण पदक घेणारी महाराष्ट्राची प्रथम बॉक्सर

खुशी ही सिनियर गटात सुवर्ण पदक घेणारी अहिल्या नगर जिल्ह्याची किंबहुना महाराष्ट्राची प्रथम बॉक्सर ठरली आहे. तिच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. डॉक्टर जाधव कुटुंबीया साठी ह्या दिवाळीसाठी हा डबल धमाका ठरला आहे कारण खुशी जाधव हिची बहीण कु ईश्वरी सचिन जाधव हिस राष्ट्रीय शालेय स्पर्धेत ह्या वर्षी रौप्य पदक मिळाले आहे. ती सुद्धा कर्नल परब ची विद्यार्थिनी आहे. त्याबद्दल तिचे जिल्हा बाॅक्सिंग संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

National Boxing Championship : राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या खुशी जाधवची सुवर्ण पदकाला गवसणी
National Boxing Championship : राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या खुशी जाधवची सुवर्ण पदकाला गवसणी

अवश्य वाचा : शेवगाव मधील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त; पोलीस, नगरपरिषदेची कारवाई

कर्नल परब यांचे मार्गदर्शन (National Boxing Championship)

खुशी हिस दुसऱ्या इयत्तेत असल्यापासून कर्नल परब स्कूल मध्ये कर्नल परब की जे भारतीय सेनेतील एक उत्कृष्ट बॉक्सर होते त्यांचे व परब मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तिने चवथ्या वर्गात असताना कब क्लास या गटात सुवर्ण पदक मिळवून सुरुवात केली व अनेक वर्ष सातत्यपूर्ण खेळ करून आज वरिष्ठ गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.

आतापर्यंत तिला अहमदनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख श्री शकील सर व पुणे येथील माजी ऑलिम्पिक खेळाडू माननीय श्री मनोज पिंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या पाच वर्षापासून ती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांचे औरंगाबाद येथील केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. तेथे तिला भारतातील विविध उच्चशिक्षित प्रशिक्षकांचे प्रशिक्षण मिळत आहे. खुशीच्या या यशाबद्दल तिच्यावर अहिल्यानगर मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.