नगर : १५ ऑगस्ट (August 15) उद्यावर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने प्रत्येक देशवासी राष्ट्रध्वज (National Flag Of India) म्हणजे तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करणार आहे. तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आणि ओळख आहे. मात्र हा तिरंगा बनवण्यामागे कोणती व्यक्ती होती ते आजही फार कमी लोकांना माहित आहे. वाचा…
नक्की वाचा : लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांसाठी ठरली डोकेदुखी;वाचा सविस्तर
कोण आहेत पिंगली व्यंकय्या ? (National Flag Of India)
आपल्या राष्ट्रध्वजाची रचना सर्वात आधी कोणी केली असेल तर ती व्यक्ती होती आंध्रप्रदेशातील पिंगली व्यंकय्या. १९२१ मध्ये त्यांनी या ध्वजाची रचना केली. पिंगली व्यंकय्या यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम येथील एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. अनेक भाषा आणि शेतीचे उत्तम ज्ञान असलेल्या व्यंकय्या यांनी आपलं आयुष्य देशसेवेत घालवलं. त्यांनी आपले शालेय शिक्षण मद्रासमध्ये पूर्ण केले आणि पदवीसाठी ते केंब्रिज विद्यापीठात गेले. तिथून परतल्यानंतर त्यांनी रेल्वेत गार्ड म्हणून काम केलं आणि नंतर लखनऊमध्ये सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पिंगली व्यंकय्या ब्रिटीश आर्मी मध्ये दाखल झाले. सैन्यात असताना दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान त्यांची महात्मा गांधींसोबत भेट झाली. गांधीजींना भेटून ते इतके प्रभावित झाले की ते कायमचे भारतात परतले आणि स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. त्यानंतर भारतासाठी स्वतःचा राष्ट्रध्वज असावा,असा सल्ला पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींना दिला. त्यानंतर गांधीजींनी त्यांच्यावरच देशाचा ध्वज बनवण्याची जबाबदारी सोपवली.
कसा तयार झाला राष्ट्रध्वज ?(National Flag Of India)
पिंगली यांना देशासाठी असा ध्वज बनवायचा होता जो देशाचा इतिहास प्रतिबिंबित करतो, त्याचा आत्मा प्रतिबिंबित करतो. त्यांनी १९१६ ते १९२१ या काळात जगातील अनेक देशांच्या राष्ट्रध्वजांचा त्यांनी अभ्यास केला. सुमारे पाच वर्षांनंतर, विजयवाडा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींना लाल-हिरव्या ध्वजाची रचना दाखवली. त्या ध्वजात दोन रंग होते लाल आणि हिरवा. ते अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र इतर धर्मांसाठी, महात्मा गांधींनी त्यात पांढरा पट्टा समाविष्ट करण्याबद्दल सांगितलं. यासोबतच राष्ट्राच्या प्रगतीचे सूचक म्हणून चरख्यालाही त्यात स्थान मिळावं,असंही सुचवलं.
तब्बल दहा वर्षांनंतर १९३१ साली तिरंगा स्वीकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात काही दुरुस्त्याही करण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ, ध्वजावर लाल रंगाऐवजी भगवा रंग जोडण्यात आला. यासोबतच भगव्या, पांढर्या आणि हिरव्या रंगासह पांढऱ्या पट्टीवर फिरणारा देशाचा तिरंगा मिळाला. जुलै १९४७ मध्ये संविधान सभेत पिंगली व्यंकय्या यांनी बनवलेल्या तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. काही काळानंतर तिरंग्यात सुधारणा करून चरख्याची जागा अशोक चक्रानं घेतली. अशा पद्धतीने पिंगली व्यंकय्या मुळे देशाला स्वतःचा राष्ट्रध्वज मिळाला.