National Goalball Championships : अहिल्यानगरमधील अनामप्रेमची कल्पना कदम ठरली राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू

National Goalball Championships : अहिल्यानगरमधील अनामप्रेमची कल्पना कदम ठरली राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू

0
National Goalball Championships
National Goalball Championships

National Goalball Championships: नगर : राष्ट्रीय स्तरावरील अंध गोलबॉल स्पर्धा (National Goalball Championships) नुकत्याच महाराष्ट्रातील (Maharashtra) गोंदिया येथे झाल्या. या स्पर्धेमध्ये दिल्ली (Delhi), हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात यासह देशातल्या विविध राज्यांच्या टीमने भाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाकडून अहिल्यानगरमधील अनामप्रेमची (Anamprem) विद्यार्थिनी कल्पना कदम व पुरुष संघाकडून अनामप्रेमचा विद्यार्थी आनंद माळवे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला व पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवले.

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल

उत्कृष्ट खेळाने महाराष्ट्राच्या संघाला मिळवून दिले अजिंक्यपद

या संपूर्ण स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ट खेळ करून महाराष्ट्राच्या संघाला अजिंक्यपद मिळवून देणारी कल्पना कदम हिला उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कल्पनाने प्रतिस्पर्धी संघा विरुद्ध २५ गोल केले. यात तामिळनाडू विरुद्ध १० पैकी ८, मध्य प्रदेश विरुद्ध ७ पैकी ६, दिल्ली विरुद्ध १२ पैकी ७, आणि हरियाणा विरुद्ध ९ पैकी ४ गोलचा समावेश आहे.

National Goalball Championships
National Goalball Championships

अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन

खेळाडू नेहा नलिन पावसकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान (National Goalball Championships)

यावेळी झालेल्या सत्कार समारंभात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित खेळाडू नेहा नलिन पावसकर यांच्या हस्ते अनामप्रेमच्या या दोन्ही गुणी खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना पावसकर मॅडम यांनी अनामप्रेम संस्था अंध, अपंग, मूकबधिर व अस्थिव्यंग या प्रवर्गासाठी करत असलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अनामप्रेमचे दोन्ही खेळाडू कल्पना कदम व आनंद माळवे यांना महाराष्ट्र गोलबॉल संघाच्या प्रशिक्षक आरती लिमजे, विजय नाईक, व्यवस्थापक सुवर्णा जोशी, अनामप्रेमचे अभय रायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.