National Peoples Court : राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक

National Peoples Court : राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक

0
National Peoples Court : राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक
National Peoples Court : राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक

National Peoples Court : नगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority) आणि वकील संघटनांच्या (Bar Association) संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात (National Peoples Court) ५१ हजार ९५४ प्रकरणे निकाली निघाले आहेत. त्यामाध्यमातून ६३ कोटी ९३ लाख ८८ हजार ८९४ रुपयांची वसुली झाली आहे. लोकन्यायालयात प्रकरणे निकाली काढण्यात अहमदनगर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.

नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध

शनिवार (ता. १४) राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार (ता. १४) राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते.

अवश्य वाचा : शहरातील ९० हजार मालमत्तांवर लावले ‘क्यूआर कोड’; अहिल्यानगर महापालिकेचा उपक्रम

रोपट्याला पाणी घालून लोकन्यायालयाचे उदघाटन (National Peoples Court)

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये ज्येष्ठ पक्षकाराच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून लोकन्यायालयाचे उदघाटन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, सी.एम.बगल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुवर्णा बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगरचे, अध्यक्ष, ॲड. अशोक बी.कोठारी, अहमदनगर बार असोशिएशन उपाध्यक्ष ॲड. महेश शेडाळे, ॲड. संजय पाटील, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. आशा गोंधळे, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. राजाभाउ शिर्के व न्यायीक अधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायालयातील सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये दिवाणी दावे, बॅंकांची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबीक वादाची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, विद्युत महामंडळाची वसुली प्रकरणे, राज्य परिवहन महामंडळची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणे, उपप्रादेशिक परिवहन विभागाची दंडाची प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे तसेच ग्रामपंचायत मालमत्ता कर आदींचा सामावेश होता.


राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दाखलपूर्व ४९ हजार ३७५ प्रकरणे, प्रलंबित २ हजार ५७९ व विशेष मोहिम अंतर्गत १ हजार २४० प्रकरणे निकाली निघालेली आहेत. लोकन्यायालयामध्ये ६३ कोटी ९३ लाख ८८ हजार ८९४ रुपयांची वसुली झाली आहे.