National Track Cycling Championship : राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशीप मध्ये महाराष्ट्राचे यश; सिद्धेश घोरपडे याने तीन सुवर्णपदके पटकावली 

National Track Cycling Championship : राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशीप मध्ये महाराष्ट्राचे यश; सिद्धेश घोरपडे याने तीन सुवर्णपदके पटकावली 

0

National Track Cycling Championship : नगर : रुद्रपूर (उत्तराखंड) येथे पार पडलेल्या ५४ व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत (National Track Cycling Championship) महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश सर्जेराव घोरपडे (Siddhesh Sarjerao Ghorpade) याने उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदके पटकावली. त्याला राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट सायकलिस्ट’ पुरस्काराने (‘Best Cyclist’ Award) गौरविण्यात आले.

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत सिद्धेश घोरपडे याने टीम स्प्रिंट, इंडिव्हिज्युअल परस्यूट आणि स्प्रिंट या तीन प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम सायकलिस्टचा सन्मान प्राप्त झाला. सब-ज्युनियर, ज्युनियर व एलिट गटात महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवली. सब-ज्युनियर गर्ल्स व सब-ज्युनियर बॉईज संघाने रनरअप ट्रॉफी पटकावत संघभावना व सातत्य सिद्ध केले.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

यांचे मोलाचे सहकार्य (National Track Cycling Championship)

स्पर्धेतील विशेष पुरस्कारांमध्ये सिद्धेश घोरपडे – बेस्ट प्लेयर अवॉर्ड, सब-ज्युनियर गर्ल्स -रनर अप ट्रॉफी, सब-ज्युनियर बॉईज -रनरअप ट्रॉफी मिळविण्यात आल्या. महाराष्ट्र संघाला मार्गदर्शक दर्शन बारगुजे, दीपाली शिलदनकर, संजय शिंदे, मॅनेजर स्वप्नील माने यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. क्रीडा प्रबोधिनीच्या मुख्य मार्गदर्शक व जिजामाता पुरस्कार विजेत्या दीपाली निकम (पाटील)यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना मोठे यश मिळाले. महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष अॅड.विक्रम रोठे, उपाध्यक्ष अविनाश कदम, धनंजय वानखेडे, यशवंत नडगम, अभिजीत मोहिते, सचिव प्रा.संजय साठे, खजिनदार भिकन अंबे व प्रा. साईनाथ थोरात यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचा गौरव केला.