Nature : सामाजिक वनीकरणामुळेच निसर्गाचे संतुलन आणि समृद्धी शक्य: विठ्ठल सालविठ्ठल

Nature : सामाजिक वनीकरणामुळेच निसर्गाचे संतुलन आणि समृद्धी शक्य: विठ्ठल सालविठ्ठल

0
Nature : सामाजिक वनीकरणामुळेच निसर्गाचे संतुलन आणि समृद्धी शक्य: विठ्ठल सालविठ्ठल
Nature : सामाजिक वनीकरणामुळेच निसर्गाचे संतुलन आणि समृद्धी शक्य: विठ्ठल सालविठ्ठल

Nature : श्रीगोंदा : “जंगलांचा विस्तार आणि पुनरुत्थान करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी नाही, तर त्यासाठी सामाजिक वनीकरणाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. पर्यावरणातील (Environmental) जैवविविधता जपणे आणि जलवायू संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय आहे,” असे प्रतिपादन उपवनसंरक्षक विठ्ठल सालविठ्ठल (Vitthal Salvitthal) यांनी केले. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित “मेरी लाइफ थीम प्रोजेक्ट (My Life Theme Project)” या अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या अभियानात जिल्ह्यातील ५० माध्यमिक विद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

नक्की वाचा: तमाशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे :  डॉ संजय नगरकर

अमोल जाधव म्हणाले की

याप्रसंगी बोलताना विभागीय वनअधिकारी अमोल जाधव म्हणाले की, “वनीकरण केवळ निसर्गासाठी नाही, तर स्थानिक समुदायांना रोजगार मिळवून देण्याचे ते एक साधन आहे. यामुळे ग्रामीण भागात आर्थिक स्थिरता येते. लोकांना जंगलांच्या संरक्षणाबाबत शिक्षित करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ यांनी सामाजिक वनीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. “जेव्हा समाज आणि पर्यावरण यांचे संतुलन साधले जाते, तेव्हाच सकारात्मक बदल घडतो,” असे त्यांनी नमूद केले.

अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी

कामगिरीचे मूल्यमापन करून पारितोषिके प्रदान (Nature)

या अभियानात जिल्ह्यातील शाळांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा (राहुरी) प्रथम क्रमांक, वीरभद्र विद्यालय, साकूर (संगमनेर) द्वितीय क्रमांक, श्री समर्थ विद्यामंदिर, सावेडी (अहिल्यानगर) तृतीय क्रमांकचे पारितोषिके प्रदान करण्यात आले. यावेळी वनअधिकारी अमोल जाधव, सहाय्यक वनसंरक्षक सोनल केसरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ, स्वप्नील ढोले, अनिल दळवी, राम माने, विठ्ठल गोल्हार, श्याम श्रीसाठ, सचिन जाधव, मनिषा सरोदे, वैशाली दराडे, स्वाती ढोले, प्रा. शबाना कर्नूलकर, मीरा जाधव, गीतांजली जोंधळे यांसह वनविभागाचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.