Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद

Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद

0
Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद
Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद

Nature trip : कर्जत : आपल्या सभोवतालील पर्यावरणात विविध जैव-प्राणी सृष्टी अस्तित्वात असून त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शहरीकरणासाठी जंगल (Forest), वने नष्ट होत असल्याने अलीकडील काळात वन्य पशु-प्राणी (Wild Animals) मानवी वस्तीत येत असले तरी ते आपले वैरी नाहीत. त्यांचे अस्तित्व टिकवणे हे आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रेहेकुरीचे वनपरिक्षेत्र (Rehekuri Forest Zone) अधिकारी मारुती मुळे यांनी केले. रेहेकुरी (ता.कर्जत) येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रमात शालेय निसर्ग सहलीसाठी (Nature trip) आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद
Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद

अवश्य वाचा: बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

वन्यजीव आणि पर्यावरणाची घेतली माहिती

१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र शासन आणि वनविभाग कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे. याच अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि त्यात असणारी जैव सृष्टीची माहिती मिळावी, यासाठी रेहेकुरी अभयारण्य (ता.कर्जत) येथे एक दिवसीय शालेय सहल आणि वन सफारी आयोजित करण्यात आली. शुक्रवार आणि शनिवारी जिल्हा परिषद शाळा गायकरवाडी, पाटेवाडी, तोरकडवाडी, रेहेकुरी, न्यू इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भेट देत अभयारण्यात असलेले विविध केंद्रांना भेट देत वन्यजीव आणि पर्यावरणाची माहिती घेत निसर्ग सफारीचा आनंद घेतला. तसेच रेहेकुरी अभयारण्याबाबत असणारी वन्यजीव सृष्टीबद्दल असणारा चलचित्रपट आणि माहितीपट दाखविण्यात आला.

Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद
Nature trip : विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग सफरीचा आनंद

नक्की वाचा: विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शालेय विद्यार्थ्यांबरोबर घेतला वनभोजनाचा आनंद (Nature trip)

यावेळी निसर्ग सफरीसाठी वनरक्षक रेहकुरी श्रेणी १ चे निलेश जाधव, अरुण साळवे, राहुल सातपुते, पिंटू बिटके, सौरभ हिपरके यांनी विशेष परिश्रम घेत प्रत्येक मुलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शास्त्रीय दाखले देत शंका निरसन केले. यासह शालेय विद्यार्थ्यांबरोबर वनभोजनाचा आनंद घेतला. मान्सून पावसाने हिरवेगार आणि विविध फुलांनी नटलेल्या निसर्गात प्राण्यांचे शिल्प असलेल्या ठिकाणी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. या वन्यजीव सप्ताहनिम्मित रेहेकुरी कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.