Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन महाराष्ट्रासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन: महाराष्ट्रासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस!

0
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन: महाराष्ट्रासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस!
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन: महाराष्ट्रासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस!

Navi Mumbai International Airport : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन’ (Navi Mumbai International Airport) संपन्न झाले.

अवश्य वाचा : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या गोष्टी बोलत होतो, त्या आज प्रत्यक्षात उतरत आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे विमानतळ नवभारताचे प्रतीक आहे.

नक्की वाचा : सावेडी उपनगरात युवकावर कोयत्याने हल्ला; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

अडथळे दूर, प्रकल्प मार्गी (Navi Mumbai International Airport)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या विमानतळाची संकल्पना 90च्या दशकातील होती, पण अनेक वर्षे कोणतेही काम पुढे जात नव्हते. देशात आणि महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर, ‘प्रगती’ पोर्टलवर हा विमानतळ प्रकल्प घेण्यात आला आणि आधीच्या 10 वर्षांत ज्या 8 एनओसी (NOCs) मिळाल्या नव्हत्या, त्या पंतप्रधान मोदी यांनी ‘प्रगती’च्या पहिल्याच बैठकीत मिळवून दिल्या. यामुळेच आज 9 कोटी प्रवासी हाताळू शकणार्‍या आणि अभियांत्रिकी चमत्कार असणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन संपन्न होत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हे विमानतळ महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये (GDP) 1% ने वाढ घडवण्याची क्षमता ठेवते. या प्रकल्पातून महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पुढे जाईल.

‘कनेक्टिव्हिटी’ची नवी क्रांती

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अटल सेतू (एमटीएचएल) तयार झाला आहे. आता तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहिले विमानतळ असेल, ज्याला वॉटर टॅक्सीची सुविधा मिळणार आहे. यामुळे प्रवासी थेट ‘गेटवे ऑफ इंडिया’ पर्यंत कोणत्याही ट्रॅफिकचा अडथळा न येता प्रवास करू शकतील.

यासोबतच यावेळी लोकार्पण झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2बी आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मार्गिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वात मोठी भुयारी मेट्रो आपण मुंबईत तयार करू शकलो, याचा अभिमान आहे. यासाठी जपान सरकार आणि जायका (JICA) यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

‘मुंबई वन’ ॲप: एकाच तिकीटात संपूर्ण मुंबईचा प्रवास

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकीकरण (Integration) व्हायला हवे, असे सांगितले होते. याच दृष्टिकोनातून आज ‘मुंबई वन’ या ॲपचा शुभारंभ करण्यात आला. मेट्रो, मोनो, बस, सबअर्बन रेल्वे आणि वॉटर टॅक्सी या सगळ्यांसाठी आता एकच तिकीट असेल. एकाच ‘प्लॅटफॉर्म’वर सर्व तिकीट आणि ‘ट्रॅव्हल प्लॅन’ही उपलब्ध होईल. मुंबईला सुगम बनवण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आज उदघाटन, लोकार्पण आणि शुभारंभ करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांसाठी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री किंजरापु राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here