नगर : जालना (Jalana) शहरात धक्कादायक घटना घडली आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची चार चाकी स्कॉर्पिओ काल (ता. २१) एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा (Scorpio lit) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने कारला आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
नक्की वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
नेमकं काय घडलं ? (Navnath Waghmare)
ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती, त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि वाहनावर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले. त्यानंतर ही आग लावून दिली. या आगीने भडका घेताच वाहनावर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा तपास करत आहेत.
अवश्य वाचा: गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका; देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान
या घटनेमध्ये स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहताच त्यांनी आरडाओरड केली. तसेच त्यांनी वाहनावर पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. यामध्ये एक अज्ञात व्यक्ती दिसल्याची माहिती समोर आली आहे.
नवनाथ वाघमारे नेमकं काय म्हणाले ? (Navnath Waghmare)
नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले की,’माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गाडी जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.