Navneet Rana : नगर : प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणा यांना भाजपमधून लोकसभेची उमेदवारी देण्याच्या विरोधात होते. याशिवाय, नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने भाजप (BJP) त्यांना अमरावतीमधून उमेदवारी देणार की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, भाजपकडून आज बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत नवनीत राणा यांचे नाव जाहीर करण्यात आले.
नक्की वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राणांच्या नावाचीच चर्चा
गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट दिले जाणार, अशी जोरदार चर्चा होती. त्यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती.
अवश्य वाचा : श्रीगोंदेतून द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण
आनंदराव अडसुळांकडून जोरदार विरोध (Navneet Rana)
मात्र, अमरावतीच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ इच्छुक होते. मला राजकारण सोडावे लागले, तरी मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांनी घेतली होती. काहीही करा पण नवनीत राणा यांना तिकीट देऊ नका, अशी विनंती भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. मात्र आता नाराजी स्विकारत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे.