Navneet Rana : नगर : अमरावतीतून भाजपाने (BJP) नवनीत राणांना लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) तिकिट दिलं आहे. भाजपाच्या जाहीर झालेल्या सातव्या यादीत नवनीत राणा (Navneet Rana) यांचं नाव आहे. तसंच नुकताच त्यांचा पक्ष प्रवेशही झाला आहे. राणांना विरोध करणारे बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणांना कसं पाडता येईल ते पाहू असं म्हटलं आहे.
हे देखील वाचा: श्रीगोंदेतील कृषी दुकानाच्या गोडाऊनला आग
उमेदवारी दिली म्हणजे विजय होत नाही (Navneet Rana)
“नवनीत राणांना तिकिट दिलं ही भाजपाची मर्जी आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही. आम्ही आमचं काम व्यवस्थित करु. उमेदवारी देऊन विजय मिळवता येतो का? तसं न झाल्यास चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणांना पाडता येतं का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराच्या आम्ही शोधात आहोत.” असं बच्चू कडूंनीम्हटलं आहे.
नक्की वाचा: तीन पिढ्यांचा संसार जमीनदोस्त; बेघर झालेल्यांना अश्रू अनावर
कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान गेला (Navneet Rana)
भाजपाचे झेंडे ज्यांनी हाती घेतले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा लोकांचा विचार करणं हे भाजपात संपलं आहे. रवी राणाने भाजपाचं कार्यालय फोडलं होतं. भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. आता काय वेळ आली पाहा. एवढी लाचारी कुणावर येऊ नये. याच रवी राणाचा जयजयकार कार्यकर्त्यांना करावा लागत असेल तर स्वाभिमान गेला आणि अभिमानही गेला.” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
राणांचा पराभव हेच आमचं लक्ष्य
अमरावतीतलं चित्र हे अमरावतीकरांच्या मनातलं असेल. मोठ्या नेत्यांनी एकत्र झालं पाहिजे. आपल्यापेक्षा ज्याला पाडायचं आहे ते लक्ष्य मनात ठेवलं पाहिजे. कोणता उमेदवार निवडून येतो त्यापेक्षा नवनीत राणांना पाडणं हे लक्ष्य असलं पाहिजे. रवी राणा घरात घुसून मारण्याची भाषा करतो, कुठेही गेलं तरी पैसे खायचे. आता पाहू पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात दम आहे. स्वाभिमान पक्ष विकून भाजपाच्या दावणीला आम्ही बांधला नाही. दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळेच आम्ही बरोबर आहोत. आमच्या मतदारसंघात खोके घेणारा नाही दणके देणारा आमदार आहे हे दाखवून देऊ.