Navra Maza Navsacha2:’नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित;’या’ दिवशी येणार चित्रपट  

'नवरा माझा नवसाचा-२' या सिनेमाची घोषणा झाली. आता या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.

0
Navra Maza Navsacha2
Navra Maza Navsacha2

Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवसाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. आता तब्बल १९ वर्षांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘नवरा माझा नवसाचा-२’ (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाची घोषणा झाली. आता या सिनेमाचं पोस्टर लॉन्च (Poster launch) करण्यात आलं आहे. सोशल मिडियावर सध्या या पोस्टरची चांगली चर्चा सुरु आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे.

नक्की वाचा : ‘उदे गं अंबे’…छोट्या पडद्यावर उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा

सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. येत्या २० सप्टेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस टी बस प्रवासात “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता “नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

चित्रपटात नेमके काय ? (Navra Maza Navsacha2)

“नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा २ चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही. मात्र  प्रेक्षकांनी निराश होण्याचे कारण नाही. कारण, प्रेक्षकांच्या लाडका लालू कंडक्टर आता टीसी झाला आहे. अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा २ चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. यामध्ये ते कंडक्टर ऐवजी तिकीट चेकरच्या भूमिकेत दिसत आहेत.

अवश्य वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनाम

‘नवरा माझा नवसाचा २’ अशोक सराफ यांची दमदार भूमिका (Navra Maza Navsacha2)

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार कलाकारांची फळी आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here