Naxal : गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान

Naxal : गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान

0


Naxal : नगर : गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना (Naxal) कंठस्नान घालण्यात आलंय. माओवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर माओवादी आणि पोलिसांमध्य तब्बल सहा तास चकमक (Encounter) झाली. या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकानं (C-60 Commandos) छत्तीसगड सीमेजवळच्या वांडोली गावात माओवाद्यांना कंठस्नान घातलं.

नक्की वाचा: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर

चकमकीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक जखमी

या चकमकीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झालेत. त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीला उपचारासाठी पाठवण्यात आलंय. अद्यापही झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात सर्च ऑपरेशन सुरुच आहे. या चकमकीनंतर गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि इतर अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेचा थरार सांगितला आहे.

अवश्य वाचा: माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

कॅम्प करून थांबले होते नक्षलवादी (Naxal)

गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले, खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, वंडाली गावाजवळ काही नक्षलवादी कॅम्प करून थांबले आहेत. येणाऱ्या नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने ते काही मोठ्या घटनेच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यामुळे लगेच C 60 चे 200 जवान असलेले पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संबंधित क्षेत्रात पाठवण्यात आले. त्यासाठी C-60 च्या पथकाने पाच पाण्याने भरलेले नाले पार केले. त्यानंतर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले.

निलोत्पल म्हणाले, पाच पाण्याने भरलेले नाले पार केल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले. सहा तास एन्काऊंटर चालले. पोलिसांनी 2000 राऊंड फायर केले. अंधाराचा फायदा घेऊन नक्षलवादी पळाले. 12 नक्षली ठार झाले आहे. त्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिला आहेत. मोठ्या संख्येने हत्यार ही जप्त केले आहे. 11 हत्यार जप्त केली आहेत. 12 ठार झालेल्या नक्षलींपैकी सर्व अनुभवी आणि महत्वाच्या पदावरील नक्षली होते. त्यामध्ये 3 divisional कमिटी मेंबर आहे. 4 एरिया कमिटी मेंबर आणि 5 प्लाटून मेंबर आहे. या सर्वांवर मिळून 86 लाख रुपयांचे बक्षीस होते.

Naxal : गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान
Naxal : गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान

सी-60 पथक म्हणजे काय?
काही वर्षांपूर्वी गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे एकत्रच होते. त्याकाळात नक्षली चळवळ चांगलीच सक्रीय होती. नक्षल्यांना जंगलाची माहिती असल्याने ते पोलिसांना चकमा देत होते. त्यामुळे नक्षलवाद्यांचे कट उधळण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी सन १९९० मध्ये सी-६० पथकाची स्थापना केली होती. त्यावेळी पथकामध्ये ६० जण होते त्यामुळे पथकाला नाव सी ६० असं पडलं.

गडचिरोलीच्या जंगलात कुठूनतरी गोळ्या झाडून नक्षलवादी पसार व्हायचे आणि पोलिस त्या दिशेने अंदाज घेत गोळीबार करत राहायचे. तेवढ्याच वेळात ते दुसरीकडे कुठेतरी कारवाई करून मोकळे व्हायचे. त्यामुळे यावर उपाय म्हणून सी-६० पथक तयार करण्यात आले. यामध्ये ६० शस्त्रसज्ज आणि पूर्ण प्रशिक्षित जवानांचा समावेश करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत असल्यामुळे नंतर ६० चे १०० – १५० अशी वाढ करत आज या पथकात जवळपास १००० जवान आहेत. या पथकाने नंतर मोठमोठ्या चकमकी यशस्वी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here