NCP : नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करण्याची मागणी; राष्ट्रवादीचे महापालिकेला प्रशासनाला निवेदन

NCP : नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करण्याची मागणी; राष्ट्रवादीचे महापालिकेला प्रशासनाला निवेदन

0
NCP : नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करण्याची मागणी; राष्ट्रवादीचे महापालिकेला प्रशासनाला निवेदन
NCP : नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करण्याची मागणी; राष्ट्रवादीचे महापालिकेला प्रशासनाला निवेदन

NCP : नगर : शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये (No Parking) उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई नागरिकांना न परवडणारी आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने दंड कमी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने महापालिका प्रशासनाकडे (AMC) करण्यात आली.

अवश्य वाचा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण; श्रीरामपूर शहरात खळबळ

अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन

यासंदर्भातील निवेदन कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, युवक अध्यक्ष केतन क्षीरसागर, लता गायकवाड, शीतल गाडे, रणजीत नन्नवरे, अभिजीत खरपुडे, आदित्य औताडे, ओमकार फिरोदे, बाळासाहेब राऊत, शुभम निस्ताने, रोहित सरना, किरण घुले, कुणाल ससाने, निलेश घुले, शुभम टाक आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तिघे जेरबंद

दंडात्मक कारवाई सामान्यांच्या आर्थिक क्षमतेपलीकडची (NCP)

अहिल्यानगरमध्ये मुंबई-पुण्याच्या धर्तीवर पे अँड पार्किंग व्यवस्था राबविण्यात येत असून हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची कामे अद्याप सुरू असून त्यामुळे सतत वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत अनेक ठिकाणी नो-पार्किंगचे स्पष्ट फलक नसल्यामुळे नागरिक अनवधानाने वाहने लावतात आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येते. ही दंडात्मक कारवाई सामान्य नागरिकांच्या आर्थिक क्षमतेपलीकडची असून ती तातडीने कमी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली आहे. जर दंडात्मक कारवाई कमी करण्यात आली नाही, तर थेट महापालिकेवर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिला आहे.