NCP : नगर जिल्ह्यातील बाराही जागा लढण्याची रणनीती; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिले संकेत

NCP : नगर जिल्ह्यातील बाराही जागा लढण्याची रणनीती; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिले संकेत

0
NCP : नगर जिल्ह्यातील बाराही जागा लढण्याची रणनीती; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिले संकेत
NCP : नगर जिल्ह्यातील बाराही जागा लढण्याची रणनीती; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिले संकेत

NCP : नगर : विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे उद्या नगर दौऱ्यावर येणार आहेत. नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बाराही जागा लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) रणनीती आखत असून तसे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिले आहेत.

अवश्य वाचा : विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू

जिल्हा कार्यकारिणी तसेच पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून ते सकाळच्या टप्प्यात शहर जिल्हा कार्यकारिणी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर दुपारी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांचे बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेत घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष नाहाटा यांनी दिली आहे.

NCP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here