NCP : अहिल्यानगर शहरातील शेकडो मेहतर समाजातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

NCP : अहिल्यानगर शहरातील शेकडो मेहतर समाजातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
NCP : अहिल्यानगर शहरातील शेकडो मेहतर समाजातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP : अहिल्यानगर शहरातील शेकडो मेहतर समाजातील नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

NCP : नगर : शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नालेगाव, भिंगार, वसंत टेकडी, सिद्धार्थनगर, सावेडी, पाईपलाईन रस्त्यासह विविध भागांमधील वाल्मिकी मेहतर समाजातील शेकडो महिला व नागरिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार गट) पक्षात मध्ये प्रवेश केला. माजी आमदार अरुण जगताप (Arun Jagtap) यांनी पक्षाचे उपरणे घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विश्वास जुना…संग्राम भैय्या पुन्हा… अशा घोषणा देण्यात आल्या.

नक्की वाचा: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू

यावेळी आमदार अरुण जगताप म्हणाले,

नगर शहर बदलण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी शहराला वेगाने विकासाच्या वाटेवर नेले आहे. या विकासाच्या मुद्यावर आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभा लढवत आहेत. शहरातील सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यास आमदार जगतापांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व जनतेच्या आशीर्वादाच्या व विश्वासाच्या बळावरच ते पुन्हा निवडणूक लढवत आहे. मेहतर समाजातील शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार जगतापांचे हात बळकट केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा: राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी!’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

आदींची उपस्थिती (NCP)

यावेळी यावेळी मेहतर समाजाचे अनिल तेजी, बिल्लू घावरी, लक्ष्मण सारसर, अनिल वाणे, शक्ती सोहत्रे, राजेश सोहत्रे, संदीप करोलिया, तुषार करोलिया, गौरव चावरे, रवी मोरकरोसे, किशोर माने, अनुप चव्हाण, जगदीश कुडिया, मुन्नाबाई चावरे आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो मेहतर समाजातील कार्यकर्त्यांनी व महिलांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाला छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, प्रवीण घावरी, प्रमोद आठवल, विशाल झुंज, शुभम टाक, रवी गोहेर, राजेश तेजी, रोहित बागडी, सनी खरारे, सचिन बागडी, मनोज बागडी, करण वाणे, हर्षल सारसर, श्रीराज चव्हाण, संदीप लखन, टिंकू चव्हाण, सुमित गोहेल, रितेश निधाने, आशिष तेजी, आकाश करोलीया, बाबासाहेब सारसर आदी उपस्थित होते.