NCP : शिवसेनेच्या ठाकरे गटाला नगर शहरात मोठा धक्का; आशा निंबाळकर राष्ट्रवादीत

NCP : शिवसेनेच्या ठाकरे गटाला नगर शहरात मोठा धक्का; आशा निंबाळकर राष्ट्रवादीत

0
NCP : शिवसेनेच्या ठाकरे गटाला नगर शहरात मोठा धक्का; आशा निंबाळकर राष्ट्रवादीत
NCP : शिवसेनेच्या ठाकरे गटाला नगर शहरात मोठा धक्का; आशा निंबाळकर राष्ट्रवादीत

NCP : नगर : शहरात रणरागिणी महिला पदाधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर व शहराध्यक्षा अरुणा गोयल यांनी आपल्या अनेक महिला समर्थकांसह आज (ता. ३०) सायंकाळी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गट पक्षात प्रवेश केला. आमदार जगताप यांनी संपर्क कार्यालयात सर्व महिलांचे स्वागत केले.

नक्की वाचा: ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही’- देवेंद्र फडणवीस

आशा निंबाळकर म्हणाल्या,

शिवसेना पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. मागील २० वर्षे निष्ठेने काम केले. उपनेते स्वर्गीय अनिल राठोड असताना आम्हाला कधीही त्रास झाला नाही. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्वच संपले आहे. शरद पवार व संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. नगर शहरातील शिवसेनेची हक्कची जागा संजय राऊत यांनी विकली आहे. शिवसेनेचे शहरातील नेते व पदाधिकारी महिला पदाधिकाऱ्यांना कधीही विचारात घेत नाहीत. आम्हाला कायम डावळले जाते. त्यामुळे आम्ही शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांनी आम्ही प्रभावी झालो आहोत. त्यामुळे आज शिवसेनेचे शिवबंधन तोडत आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा: विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबईतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

आमदार संग्राम जगताप म्हणाले,

शिवसेना पक्षात अनेक वर्षांपासून चांगले काम या सर्व महिला भगिनींनी केले. जिल्ह्यात व शहरात एक चळवळ उभी केली. अनेक घटनांना प्रसंगांना सामोरे जात वाघिणीसारखे तोंड दिले आहे. मात्र, शिवसेनेमध्ये यांच्या कामाची कधीही दखल घेतली गेली नाही, त्यांना डावलले, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले ही शोकांतिका आहे. मागील अनेक आंदोलनामुळे या महिलांवर झालेल्या गुन्ह्यांबाबतही शिवसेनेने कधी सहकार्य केले नाही. पक्षाने व नेत्यांनीही जबाबदारी झटकत दुर्लक्ष केले. त्यामुळे या महिला पदाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एक चांगली काम करणारी टीम आज राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असल्याने पक्षाचे काम अधिक बळकट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आदींसह पदाधिकारी होते उपस्थित (NCP)

यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील उपशहर प्रमुख मुक्ता मिटे, मंगला गुंदेचा, राधा सोनगरा, ज्योती गोयल, सुचता कदम, श्रुती शिंदे, आशा शिंदे, सुषमा पडोळे, लता पठारे, संगीता ससे, प्रमिला गोयल आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, गणेश भोसले, संजय चोपडा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.