NCP : विकसित अहिल्यानगर करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध : बारस्कर

0
NCP : विकसित अहिल्यानगर करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध : बारस्कर
NCP : विकसित अहिल्यानगर करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध : बारस्कर

NCP : नगर : स्वच्छ सुंदर व हरित शहराची ओळख निर्माण करून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) गेल्या १० वर्षांपासून काम करत आहे. विकासात्मक कामे करून विकसित अहिल्यानगर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे हात बळकट करण्यासाठी नगरकरांनी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करावी. या नोंदणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर (Sampat Baraskar) यांनी केले.

नक्की वाचा : कॉमेडियन कुणाल कामराची चार पानी पोस्ट चर्चेत;पोस्टमध्ये नेमकं काय ?  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी अभियान

नंदनवन नगर राजवीर चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीना चव्हाण, रंजना उकिर्डे, सुजाता कदम, आरती उफाडे, सुनंदा सिरवाळे, कारभारी शेंडे, श्रीराम अनारसे, नवनाथ एकशिंगे, दीपक दहे, सचिन पवार, दीपक डावरे, विक्रम पातकळे, सचिन महाशिखरे, जगन्नाथ गुजर, रवींद्र वाघ, शिवाजी कोकाटे, हरीश औताडे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : मी आरोपांवर उत्तर देत नाही’;कुणाल कामराच्या गीतावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया  

शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप प्रयत्नशील (NCP)

स्वच्छ सुंदर व हरित शहराची ओळख निर्माण करून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप गेल्या १० वर्षांपासून काम करत आहे. तसेच विकसित शहर निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. त्या माध्यमातून शहरात विकासाची कामे सुरू आहेत.